dcc sangli.jpg
dcc sangli.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पीक कर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' चे सावट आणि संचारबंदीमुळे पीक कर्ज भरण्याची मुदत 31 मार्च रोजी संपत असतानाच काल झालेल्या बैठकीत 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला. रिझर्व्ह बॅंकेच्या धोरणात्मक सूचनानुसार हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2019-20 च्या खरीप हंगामासाठीच ही मुदतवाढ राहणार आहे. याबाबत जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांना परिपत्रक काढून सर्व शाखांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

"कोरोना' मुळे "लॉक डाऊन' चा निर्णय घेतला असून संचारबंदी देखील लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडणे मुश्‍किल बनले आहे. अशातच खरीप हंगामातील पीक कर्ज भरण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंतच असल्यामुळे गेले काही दिवस शेतकरी चिंतेत होते. काही ठिकाणी शाखांमध्ये गर्दी झाली होती. शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळण्याची प्रतिक्षा लागून होती. अखेर रिझर्व्ह बॅंकेने 27 मार्च रोजी परिपत्रक काढून शेती कर्जाच्या परतफेडीबाबत बॅंकांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा बॅंकेने 31 मार्च रोजी "सर्क्‍युलर' बैठकीत त्याबाबत कार्यवाही करण्याचे निश्‍चित केले. 


रिझर्व्ह बॅंकेच्या सुचनेनुसार 2019-20 च्या खरीप हंगामातील पीक कर्जाची परतफेडीची मुदत 31 मार्च ऐवजी 30 जून 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कापूस व इतर खरीप आणि रब्बी पिकांच्या कर्ज परतफेडीची मुदत 30 जून पर्यंत वाढवली आहे. डाळींब व द्राक्ष पीक कर्जाची मुदत 24 एप्रिल 2020 पर्यंत आहे. ती देखील 30 जूनपर्यंत वाढवली आहे. ऊस पीकाची मुदत 30 जून असून त्याला मुदतवाढ लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे. संस्थांना किंवा शेतकऱ्यांना बॅंकेने वाटप केलेल्या 30 टक्के कन्झम्पशन कर्ज वाटपाला देखील मुदतवाढ लागू राहणार आहे. 


कर्ज परतफेडीला मुदतवाढ दिली असली तरी केंद्र शासनाचा तीन लाखपर्यंत पीक कर्जाला असलेला 3 टक्के व्याज परतावा मात्र 31 मे पर्यंतच मिळणार आहे. तसेच राज्य शासनाचा शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतच्या कर्जासाठी मिळणारा तीन टक्के आणि तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठीचा एक टक्के व्याज परतावा 30 जूनपर्यंतच्या सर्व पीकांना मिळणार आहे. 
मध्यम व दीर्घ मुदत कर्जाचे हप्ते एक मार्च 2020 ते 31 मे 2020 पर्यंत वसुल पात्र असतील अशा कर्ज हप्त्यांना देय तारखेपासून तीन महिने मुदतवाढ मिळेल. मात्र सभासदांनी मागणी केल्यानंतरच ही मुदतवाढ मिळेल. तसेच कर्ज खात्यावरील येणेबाकीवर बॅंकेच्या धोरणानुसार व्याज आकारणी करण्यात येईल. मध्यम व दीर्घ मुदत कर्जाच्या मुदतवाढीची प्रकरणे 10 मे 2020 पर्वी सादर करून मंजुरी घ्यावी. मुदतवाढ फक्त विनाथकीत कर्जासाठीच आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ मिळणार नाही. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचारातून गायब? शरद पवारांनी व्यक्त केली काळजी

Swati Maliwal News : दिल्लीच्या राजकारणात भूकंप! कुठे आहेत स्वाती मालीवाल? मारहाणीच्या मुद्द्यावरुन भाजपने 'आप'ला घेरलं

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Rakhi Sawant Health Update: राखी सावंतला नेमकं काय झालंय? पूर्वाश्रमीच्या पतीनं दिली हेल्थ अपडेट

Astronomers: खगोलशास्त्रज्ञांनी 55 प्रकाशवर्षे दूर पृथ्वीच्या आकाराचा एक नवीन ग्रहाचा लावला शोध

SCROLL FOR NEXT