पश्चिम महाराष्ट्र

पाण्यावरून दोन आमदार आमनेसामने

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगावसह १३ गावांतील पाणीप्रश्‍नावरून या मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक व त्यांचे विरोधक आमदार सतेज पाटील यांच्यात जुंपली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आमदार पाटील यांना पाचगावची आठवण झाल्याचा टोला श्री. महाडिक यांनी लगावला, तर आम्ही २०१४  मध्येच ही योजना मंजूर केल्याचा दावा करून श्री. पाटील यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभा निवडणुकीत यानिमित्ताने काय होणार, याची झलक आतापासूनच पाहायला मिळत आहे.

२०१४ च्या निवडणुकीत खासदार महाडिक यांचे चुलत बंधू आमदार अमल महाडिक यांच्याकडून श्री. पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाडिकांना विरोध म्हणून ‘आमचं ठरलंय’ म्हणत जोरदार मोहीम उघडली. हा धुरळा खाली बसण्यापूर्वीच या दोन आमदारांत पाणीप्रश्‍नावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. 

श्री. महाडिक हे पाणीप्रश्‍न सुटावा म्हणून प्रयत्न करत असताना दोन दिवसांपूर्वी श्री. पाटील यांनीही याच प्रश्‍नावर पंचायत समितीत बैठक घेतली. आपण २०१४ मध्येच पाचगावसह १३ गावांची पाणी योजना मंजूर करून घेतली होती, पण त्याचा पाठपुरावा न झाल्याने हे काम थांबल्याचा दावा श्री. पाटील यांनी केला आहे. काही महिन्यांपासून बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन पाचगाव, कंदलगाव, मोरेवाडी आणि कळंबा या चार गावांसाठी दूधगंगा नदीचे पाणी नंदगावमार्गे कळंबा येथील गायरान येथे आणून तेथून या चारही गावांना देण्याची सुमारे १२० कोटींची योजना आम्ही आखली आहे.

या योजनेचे प्रेझेन्टेशन १४ तारखेला चारही गावांसमोर दाखवणार आहोत, मंजुरीनंतर मी स्वतः या योजनेचा पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेणार असल्याचे श्री. पाटील म्हणतात. त्याला प्रत्युत्तर देताना श्री. महाडिक यांनी निवडणुकांच्या तोंडावरच श्री. पाटील यांना पाचगावची आठवण झाल्याचा टोला लगावला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT