ahilyadevi-holka solapur univercity 
पश्चिम महाराष्ट्र

ठरला...सोलापूर विद्यापीठाचा नॅक मूल्यांकनाचा मुहूर्त

तात्या लांडगे
सोलापूर : परीक्षा विभागाच्या गैरप्रकारांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी शिक्षण घेणे पसंत केल्याचे चित्र आहे. सोलापुरात स्वप्नपूर्ती होईल असा रोजगार मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतरही मोठे आहे. त्यामुळे सप्टेंबर 2020 मध्ये होणाऱ्या नॅक मूल्यांकनासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाला आकडेवारीची जुळवाजुळव करावी लागत आहे. दरम्यान, विद्यापीठाचा अहवाल मार्च-एप्रिलमध्ये नॅक कमिटीला पाठविला जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे यांनी दिली.


हेही वाचाच...'एमपीएससी'च्या अर्धवट पॅनलमुळे भावी फौजदारांची 'परीक्षा'


स्वतंत्र जिल्ह्यासाठी 2005 मध्ये स्थापन झालेल्या सोलापूर विद्यापीठाने 2015 मध्ये नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यापन परिषद) मूल्यांकन मिळवले. नॅक मूल्यांकनानंतर मिळणारा निधी प्राप्त करण्यासाठी विद्यापीठ स्तरावरुन हालाचाली सुरु झाल्या असून नामविस्तारानंतर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रथमच नॅक मूल्यांकनाला सामोरे जात आहे. तत्पूर्वी, मार्च-एप्रिल 2020 मध्ये अहवाल सादर केला जाणार असून नॅक मूल्यांकनाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी विद्यापीठाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. दर पाच वर्षांनंतर नॅक मूल्यांकन करणे आवश्‍यक असून त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मागील चार वर्षांचे सेल्फ स्टडी रिपोर्ट ऑनलाइन सादर करण्यात आले असून यंदाचा रिपोर्ट मार्चपर्यंत पाठविला जाणार आहे. तर विद्यापीठाने सुरु केलेले नवनवे अभ्यासक्रम, त्यातून उपलब्ध झालेला रोजगार, कॅम्पस्‌ सिलेक्‍शन, विद्यापीठातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केलेली सोय, समाजोपयोगी संशोधन प्रकल्पाची माहिती संकलित करण्याचे कामही युध्दपातळीवर सुरु झाले आहे.


हेही वाचाच...अबब...'यांना' दरमहा 40 लाखांच्या वसुलीचे टार्गेट
 
  • ठळक बाबी...
  • नॅक मूल्यांकनासाठी 70 टक्‍के पडताळणी ऑनलाइन
  • 30 टक्‍के कामांची पाहणी करण्यासाठी नॅक कमिटी सप्टेंबरमध्ये येणार विद्यापीठात
  • मार्च-एप्रिलमध्ये जाणार विद्यापीठाचा नॅक कमिटीला अहवाल : सप्टेंबरमध्ये होणार पाहणी
  • कॅम्पस्‌ सिलेक्‍शन अन्‌ विद्यार्थी रोजगाराचा विद्यापीठ प्रशासनाला येईना अंदाज
  • ढिगभर संशोधन प्रकल्पातून मोजके प्रकल्प काढण्यासाठी विद्यापीठाची तारेवरची कसरत


हेही वाचाच...जिल्हा बॅकांना सरसकट कर्जमाफीची आशा


नॅक मूल्यांकन पुढील वर्षात मिळणारच
पुढील वर्षी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नॅक मूल्यांकनासाठी सामोरे जात आहे. दरवर्षीचा विद्यापीठाचा अहवाल, संशोधन प्रकल्प, नवीन अभ्यासक्रम याची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या पुढाकारातून यंदा विद्यापीठाला निश्‍चितपणे नॅक मानांकन मिळेल, असा विश्‍वास आहे.
- डॉ. व्ही. बी. घुटे, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोन्याची झळाळी झाली कमी, ४ दिवसात ७ हजारांनी स्वस्त; आज किती आहे दर?

Kolhapur Collector Office : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शिक्षकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न, अचानक घडलेल्या प्रकारामुळे तणाव

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याला पावसाने झोपडले

'जैन मंदिर किंवा मंत्रिपद वाचवा', मोहोळ यांना मुंबईत वरिष्ठांनी वॉर्निंग दिल्याचा धंगेकरांचा खळबळजनक दावा

HIV infected Blood : हॉस्पिटलचा हलगर्जीपणा, थॅलेसिमियाग्रस्त ५ मुलांना चढवले एचआयव्ही संक्रमित रक्त

SCROLL FOR NEXT