Decision of the Zilla Parishad administration; Cameras in the parking lot 
पश्चिम महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांवरही असेल आता "सीसीटीव्ही'ची करडी नजर 

दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेमधील सर्व विभाग "सीसीटीव्ही'च्या करड्या नजरेखाली येणार आहेत. सध्या असलेल्या "सीसीटीव्ही'च्या कॅमेऱ्यांमध्ये कोणत्या विभागात कोण आले, कोण गेले, हेच दिसते; आपापल्या विभागात बसलेले कर्मचारी दिसतच नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व विभागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. कोण आले व कोण चालले हे त्यात दिसून येत आहे; मात्र विभागात आपापल्या जागेवर बसलेले कर्मचारी दिसत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने आता सर्व विभागांमध्ये कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देऊन तसे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगण्यात आले आहे. बांधकाम विभागानेही जिल्हा परिषदेमध्ये किती कॅमेरे लागतील याच्या नियोजनाचे काम हाती घेतले आहे. प्रथमदर्शनी 20 कॅमेरे बसविले जाण्याची शक्‍यता आहे. 

टेबल सोडून फिरणाऱ्यांना लगाम 
कार्यालयीन वेळेत काही जण घरगुती व अन्य कामे करीत फिरत असतात. त्यांच्यावर या "सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांचा "वॉच' राहणार आहे. त्यांच्या फिरण्याला लगाम बसणार आहे. 

पार्किंगमध्येही कॅमेरे 
जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात उभी केलेली वाहने चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या परिसरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत "जिल्हा परिषदेतील बेशिस्त पार्किंग सुधारणार कधी?' असे वृत्त "सकाळ'ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. विशेष म्हणजे या परिसरात बाहेरील व्यक्तींकडून वाहने उभी केली जात असल्यामुळे, त्यांच्याकडून शुल्क आकारण्याबाबतही हालचाली सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा चारपट वाहने येथे उभी असतात. ही सर्वच वाहने कर्मचाऱ्यांची नसल्याचे स्पष्ट झाल्याने, तेथे कॅमेरे बसवून शुल्कआकारणीचा निर्णय घेतल्याचे समजते. 

जिल्हा परिषदेमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेतच; शिवाय आवारातून वाहने चोरीला जाण्याच्या घटनांना लगाम घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या सूचनेनुसार पार्किंगमध्येही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT