mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा तालुक्यात पाच ठिकाणी घरफोड्या

प्रशांत माळी

आंधळगाव : मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे शुक्रवारी रात्री चार-पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या असुन चोरीची तक्रार मंगळवेढा पोलिस स्टेशन देण्यासाठी गेलेल्या शिवाजी आदाटे यांची तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे नागरिकांतून पोलिस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एकाच वेळी लक्ष्मी दहिवडीमध्ये चार-पाच ठिकाणी चोरी झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी आदाटे यांच्या घरातील सोन, चांदी व इतर वस्तू तर आशिप तांबोळी यांच्या घरातील रोख रक्कम १० हजार तर २२ हजार रूपये किंमतीचे मनगटी घड्याळ चोरी गेले असुन या ठिकाणी चोरट्याचा स्वेटर पडला आहे. याच राञी भगवान कुंभार यांच्या दुकान चे कुलुप तोडून पैशाचा ड्राव्हर उचकटला आहे. विलास कस्तुरे यांच्या घरातील कपाटातील साहित्य अस्तावेस्त केले आहे. वंसत कोष्टी व सिद्धेश्वर कोष्टी यांच्या घरातील कुलुप तोडून कपाटातील साड्या विसकटले आहे. शिवाजी आदाटे तक्रार देण्यासाठी पहाटे मंगळवेढा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेतली नाही तक्रार देण्यासाठी सकाळी यावे असे उत्तर ठाणे अंमलदार यांनी दिल्यामुळे पोलिस प्रशासन विषयी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लक्ष्मी दहिवडीमध्ये एकाच राञी चार-पाच ठिकाणी घरफोड्या झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले असुन चोरी झालेल्या एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दोन चोरटे कैद झाले असुन त्या फुटेजच्या आधारे पोलिस नाईक सोनलकर व पोलिस पाटील मधुकर पाटील यांनी माहिती घेतली आहे. पोलिस नाईक सोनलकर व पोलिस पाटील मधुकर पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली असुन घडलेल्या ठिकाणची माहिती घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT