Decrease in water level; Waiting for the recurrence of "Mahisal" 
पश्चिम महाराष्ट्र

पाणी पातळीत घट; "म्हैसाळ'च्या आवर्तनाची प्रतिक्षा 

विष्णू मोहिते

सांगली : जिल्ह्यात जोरदार पाऊस, अतिवृष्टी तरीही जिल्ह्याच्या पूर्व भागातील पाणी पातळी घटली आहे. रब्बी हंगामातील पिकांनाही म्हैसाळ योजनेतून पाण्याची गरज आहे. मिरज पूर्व, तासगाव पूर्व, कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यातील भूजल पातळीत घटत आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हैसाळ योजना सुरु करावी. योजना वेळेवर सुरु झाली नाही तर शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता आहे. 

महापूर, अतिवृष्टी, परतीच्या पावसाने जिल्ह्याच्या पूर्व भागातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. बागायती परिसरात पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने दीड महिन्यांपासून पाणी पातळी घटते आहे. यामुळे फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांकडून मागणी नोंदवण्याकडे लक्ष आहे. 

जिल्ह्याच्या पूर्व भागात पाझर तलावात सध्या 40 ते 45 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. लघु व मध्यम पाणी प्रकल्पांतील पाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. यंदा चांगला पाऊस, अतिवृष्टी आणि परतीचा पावसामुळे पाझर तलाव, लघु मध्यम प्रकल्पासह, विहिरी, कूपनलिका व बंधारे तुडुंब भरले. जिल्ह्यातील सिंचन योजनांतून तलाव भरुन घेतले होते. जानेवारीतच जाणवणारी पाणीटंचाई महिनाभर लांबली आहे. यंदा पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असे वाटत होती. मात्र, मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या उपशामुळे झाल्यामुळे जानेवारीपासूनच पाणी पातळी घटली आहे. 

टेंभू योजना सुरु... 
रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकरी व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्या पाठपुराव्यामुळे टेंभू योजनेचे आर्वतन सुरु झाले आहे. त्याच धर्तीवर म्हैसाळ योजना तातडीने सुरु करण्याची गरज आहे. 

म्हैसाळ योजना सुरु करण्यासाठी अद्याप शेतकऱ्यांची मागणी आलेली नाही. तरीही सोमवारपासून (ता. 15) गावोगावची मागणी अभियंता नोंदवून घेतील. 50 टक्के शेतकऱ्यांची मागणी असल्याशिवाय योजना सुरु करता येणार नाही. शेतकऱ्यांनी मागणी नोंदवताच आम्ही तातडीने योजना सुरु करु. 
- सुर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ सिंचन योजना.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी सुरु,

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT