Delay in Tapovan road work 
पश्चिम महाराष्ट्र

याचा मुहूर्त लांबणीवर! 

विठ्ठल लांडगे

नगर : उपनगरातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तपोवन रस्त्याचे काम येत्या 31 डिसेंबरला पूर्ण होईल, असे ठोस आश्‍वासन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी मागील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. या बातमीने खूश झालेल्या उपनगरातील नागरिकांचे स्वप्न अखेर भंगल्याचे आज स्पष्ट झाले. त्यात रस्त्याचे काम पूर्ण होण्यास अजून किती कालावधी लागेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे महापालिका व योजनेच्या यंत्रणांविषयी या भागातील जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. 

ठेकेदारास दिलेल्या निर्धारित वेळेत काम पूर्ण होत नसल्याने जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची महापालिका आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या यंत्रणेची स्पर्धा सुरू झाली आहे. बहुचर्चित, वादग्रस्त आणि कायमच विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या तपोवन रस्त्याचे काम येत्या 31 डिसेंबर 2019पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता एम. आर. दिलवाले यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात दिली होती. त्यात त्यांनी कार्यारंभ आदेश व काम पूर्ण करण्याची तारीखही दिली होती. त्यानुसार काल (ता. 31 डिसेंबर) हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, अजूनही रस्त्यावर बहुतांश भागात खडीच दिसते. त्यामुळे या भागातून रोज प्रवास करणाऱ्यांमध्ये दोन्ही प्रशासनांविषयी चीड आहे. 

साडेचार किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. नगरमधील ठेकेदार आर. एच. दरे यांनी या कामाचा ठेका मिळविलेला असून, त्यांना एक जानेवारी 2019 रोजी कार्यारंभ आदेश मिळाला आहे. रस्त्याचे काम पुढील बारा महिन्यांत पूर्ण करण्याची अट त्यात होती. त्यानुसार काम 31 डिसेंबर 2019पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, ते काम अजून पूर्ण न झाल्याने आज संबंधित यंत्रणेकडून त्यावर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण न झालेल्या कामाचे खापर महापालिका प्रशासनावर फोडले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ऍड. सुधीर टोकेकर यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांकडून ही माहिती मागविली होती. तसेच काम पूर्ण करण्यासाठी खासदार व आमदारांना साकडे घातले होते. 

एक महिन्यात काम पूर्ण होईल 
तपोवन रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार एजन्सीला 31 डिसेंबर 2019ची डेडलाइन दिली होती. तथापि, साधारण दोन किलोमीटर अंतरावर याच रस्त्याच्या कडेने करण्यात आलेल्या पाण्याच्या पाइपलाइनसाठी रस्ता खोदण्यात आला. त्यातून निघालेली काळी माती याच रस्त्यावर अंथरलेल्या खडीवर टाकण्यात आली. त्या संदर्भात महापालिकेस अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, महापालिका प्रशासनाने ही माती काढून न घेतल्याने कामास विलंब होत आहे. त्यातही टाकलेली काळी माती काढण्यासाठी कोणतीही नुकसानभरपाई महापालिकेने दिलेली नाही. सध्या कामाला गती असून, पुढील एक महिन्यात काम पूर्ण होईल. 
- अभय पेशवे, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, नगर 

1 जानेवारी 2019 
कार्यारंभ आदेशाची तारीख 
12 डिसेंबर 2019 
काम पूर्ण करण्याची तारीख 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT