Teachers 
पश्चिम महाराष्ट्र

दिल्लीतील शाळेंच्या अभ्यासासाठी तज्ञ गटाची निवड; राज्यशासनाचा निर्णय

कोल्हापूर जिल्ह्यातून दोघांचा समावेश समावेश

प्रकाश तिराळे

मुरगूड : दिल्ली (Delhi) निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी झालेले बदल, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी व शिक्षकांसाठी (Student And Teachers) असणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार - विचार व शिस्त शिक्षकांच्या शिकविण्याची कार्यपध्दती आदी गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याकरिता तज्ञ मंडळीचा अभ्यासगट राज्य शासनाने नेमला आला असून त्यामध्ये कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संजयसिंह चव्हाण व कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी. कमळकर यांचा समावेश केला आहे.

दिल्ली सरकाराच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये काळानुरूप शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झालेल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी व शिक्षकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा,विद्यार्थ्यांचे आचार - विचार, शिस्त तसेच शिक्षकांच्या शिकविण्याची कार्यपध्दती यासारख्या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास या तज्ञ मंडळीच्या अभ्यासगटाकडून केला जाणार आहे. व त्याबाबतचा अहवाल शासनास दोन महिन्याच्या आत सादर करणार आहे.

या अभ्यासगटामध्ये शिक्षण क्षेत्रातील कांही तज्ञ मंडळींचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुसार शुक्रवार ता.१७ डिसेंबर, २०२१ च्या शासन निर्णयानुसार हा अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.या अभ्यास गटाचे पथकप्रमुख म्हणून औरंगाबादचे जिल्हाधिकारी,सुनिल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या अभ्यासगटाची पुनर्रचना करुन त्यामध्ये दहा जणांना सामावून घेतले आहे.या अभ्यास गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून कागल पंचायत समितीचे डॉ.जी.बी.कमळकर यांचा समावेश केला आहे.

पुनर्रचना करण्यात आलेला अभ्यासगट असा :

सुनिल चव्हाण,(जिल्हाधिकारी, औरंगाबाद, प्रथम प्रमुख),निलेश गटने (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,औरंगाबाद), संजयसिंह चव्हाण, (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर) डॉ.बी.बी.चव्हाण, (उप संचालक (शिक्षण) नाशिक), डॉ.गणपती कमळकर,(गट शिक्षणाधिकारी,पंचायत समिती कागल, जि.कोल्हापूर),पोपट श्रीराम काळे,(गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती राहाता, जि. अहमदनगर),आर.एस.शेख (सेवानिवृत्त विशेष लेखा परिक्षक, वर्ग-१ सह.संस्था),सुनिल सुरेशराव चिपाटे (मुख्याध्यापक, जि.प.प्राथमिक शाळा वडगाव कोण्हाटी, जि.औरंगाबाद.),संदिप गुंड,(उप अध्यापक, जिल्हा परिषद, ठाणे, सच्या कार्यरत समन्वयक | डिजिटल शाळा अभियान, जिल्हा अहमदनगर / कोल्हापूर.) काशिनाथ रामदास पाटील,(सहशिक्षक, माणिकराव पालोदकर विद्यालय,फर्दापूर, ता. सोयगाव, जिल्हा औरंगाबाद,) जगन सुरसे,(सहशिक्षक, जिल्हा परिषद शाळा, वरुर,ता. सिल्लोड,जिल्हा औरंगाबाद,)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock : 'या' एका स्टॉकने गुंतवणूकदारांची केली चांदी! तुमची १ लाखाची गुंतवणूक आज झाली असती ६४ लाख रुपये...

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

Video : अर्जुन स्वतःच्या जीवाशी खेळून महिपतला पोलिसांच्या हवाली करणार ! नव्या ट्विस्टने प्रेक्षकही चकित

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

SCROLL FOR NEXT