Delivery took place in the vehicle
Delivery took place in the vehicle 
पश्चिम महाराष्ट्र

हलवा नगरला, वाहनातच डिलिव्हरी... महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हेळसांड

नीलेश दिवटे

कर्जत ः महिला दिनी सर्वच क्षेत्रातील काम करणार्या स्त्रीयांचा गौरव करण्यासाठी चढाओढ लागते. स्त्रीयांमुळे जग कसं टिकून आहे, अशा शब्दांत आरती ओवाळली जाते. मात्र, या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कर्जतमध्ये एका गरोदर महिलेची हेळसांड झाली. त्यामुळे कदाचित तिच्या जीवालाही धोका होता.

कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील शल्यचिकिस्तक त्रास वाचविण्यासाठी एका गरोदर महिलेला नगर येथे रेफर केले.
त्याचे असे झाले ः तालुक्यातील एका गावातील महिला प्रसूतीसाठी येथील जिल्हा उपरुग्णालयात ता.३ रोजी दाखल झाली. त्या दिवशी रात्रभर तिच्याकडे कुणी फिरकलेच नाही आणि दुसऱ्या दिवशी ता 4 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांनी  परिस्थिती अवघड आहे. बाळाच्या मानेभोवती  नाळ गुंडाळली आहे, पेशंट नगर घेऊन जावे लागेल असे सांगितले..

त्यामुळे महिलेला 108 रुग्णवाहिकेतून नगरला हलविण्यात आलं. गर्भवती महिला घेत नगरच्या दिशेने रवाना झाली. मात्र नगर-सोलापूर मार्गावर घोगरगाव नजीक महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या.

पुढे काही अंतरावर भररस्त्यात रुग्णवाहिकेत महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. सदर महिला व तिचे बाळ सुखरूप आहे. मात्र,कर्जत येथील जिल्हा उपरुग्णालयात वेळीच प्रसूती झाली असती तर बाळ आणि त्याच्या मातेला हाल व त्रास सहन करावा लागला नसता,अशी कैफियत सदर महिलेच्या बहिणीने सांगितली. या बाबत जिल्हा शल्यचिकित्सकांचे रीतसर तक्रार अर्ज केला असल्याचे सांगितले.

रिस्क होती मग नॉर्मल डिलेव्हरी कशी

बऱ्याच गरोदर महिलांची प्रसूत करण्याऐवजी कर्जतचे डॉक्टर नगरला पाठवतात. त्यामुळे महिलांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. काहीजण खासगी हॉस्पीटलमध्ये नेतात. त्यांना लाखो रूपयांचा भुर्दंड बसतो. काल रेफर केलेल्या महिलेची अवस्था जिकीरीची होती मग तिची डिलेव्हरी नॉर्मल कशी असा सवालही उपस्थित केला जात आहे.

म्हणून नगरला पाठवलं 

या बाबत तेथे उपचारासाठी उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन डफळ म्हणाले की, येथे सोनोग्राफीची सुविधा नाही. मात्र सदर महिलेची आठवड्यापूर्वी केलेला सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिला असता गर्भातील  बाळाच्या गळ्याभोवती नाळ असल्याचे लक्षात आले. तसेच बाळाचे वजनही वाढल्याने ते खाली-वर सरकण्यास अडचण झाली असती. येथे प्रसूतिशास्र तज्ञ महिला नसल्याने रिस्क नको म्हणून सदर महिलेला नगरला पाठविले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT