Demand for independent Shendgewadi Gram Panchayat to the District Collector; MLA Padalkar 
पश्चिम महाराष्ट्र

स्वतंत्र शेंडगेवाडी ग्रा.पं.ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; आमदार पडळकरांनी घेतली भेट 

सकाळवृत्तसेवा

खरसुंडी (सांगली) : शेंडगेवाडी (ता. आटपाडी) मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. स्वतंत्र ग्रामपंचायत, महसुली गाव करा, अशी लेखी मागणी निवेदनाद्‌वारे करण्यात आली आहे. शेंडगेवाडी आटपाडी ग्रामपंचायती अंतर्गत येते. एक सदस्य निवडून दिला जातो.

ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील एका टोकाचे हे गाव असल्यामुळे विकासापासून वंचित आहे. गेली काही वर्षे मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. ग्रामस्थांपैकी काही तरुण सुविधांसाठी वरचेवर प्रयत्न करतात. ग्रामस्थांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सुविधा बाबत लेखी निवेदन दिले. 


15 ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले सुनील कचरेही हजर होते. आमदार पडळकर आणि ग्रामस्थांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याबाबत समक्ष जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एक वेळ शेंडगेवाडीस भेट द्या, असेही त्यांनी सांगितले. 


जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्वतंत्र महसुल गाव व ग्रामपंचायत व्हावी अशी मागणी केली आहे. आमदार पडळकर व ग्रामस्थांनी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले तर स्वतंत्र महसुल व ग्रामपंचायत झाल्यास विकास होऊ शकतो. सध्या विकासकामासाठी थेट ग्रामपंचायतीस निधी मिळत असल्याने कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

रस्ते,पाण्याची समस्या व स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागेल. ग्रामस्थांतून सोमनाथ शेंडगे, समाधान कचरे, विनायक शेंडगे, नाना शेंडगे, बाळू शिंदे, दाजी शिंदे, भीमराव शेंडगे व ग्रामस्थांनी समस्या पूर्तीची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Suspended : पुण्यात खाकीला लाज आणणारी घटना ! सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत तरूण-तरुणींकडून उकळले पैसे, ३ पोलीस निलंबित

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकार! कपडे बदलताना महिलेचे CCTV त चित्रीकरण; दुकान मालक अटकेत

आशिष नेहराची लाईव्ह सामन्यात शुभमन गिलला शिवी; DC vs GT सामन्यात बरेच काही घडले Video Viral

Stock Market Today:युद्ध थांबलं तरी शेअर बाजार घसरला! काय आहे कारण? TCS चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : नागपूरमधील गॅस गोदामात चुकीच्या संदेशामुळे ग्राहकांचा संताप

SCROLL FOR NEXT