Demand for privatization of Solapur Municipal Transport Department 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर महापालिका परिवहन विभागाचे खासगीकरण करण्याची मागणी

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - सातत्याने होणारा तोटा आणि उपक्रमावर वाढत चाललेला बोजा पाहता महापालिका परिवहन उपक्रमाचे खासगीकरण करावे किंवा ते एसटी महामंडळाकडे हस्तांतरीत करावे, अशी शिफारस व्यवस्थापकांनी केली आहे. 

परिवहन उपक्रमावर आजच्या घडीला 32 कोटी 58 लाख रुपये देणे आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ न बसल्याने त्याचा बसच्या देखभाल व दुरुस्तीवर परिणाम होऊन बसची संख्या कमी होत गेली आहे. उत्पन्न कमी, खर्च जास्त, बसची संख्या कमी आणि सुट्या भागाच्या किंमतीत वाढ यामुळे उपक्रमाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. 2018-19 या आर्थिक वर्षांत परिवहन उपक्रमाला 24 कोटी 93 लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे, तर खर्च 30 कोटी 18 लाख रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास सव्वापाच कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. याशिवाय, 2017-18 अखेर 32 कोटी 92 रुपयांचे कर्ज उपक्रमावर आहे. आजची आर्थिक स्थिती पाहता उपक्रमाचे खासगीकरण करणे, एसटी महामंडळाकडे वर्ग करणे किंवा महापालिकडून भरीव निधी घेणे हे तीन उपाय करावे लागणार आहेत. या उपायांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास उपक्रमाची आर्थिक स्थिती आणखी ढासळणार आहे, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

आजच्या घडीला 36 बस मार्गावर असून त्यापासून दरमहा 64 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. 2009-2014 या कालावधीत उत्पन्नाचा साकल्याने विचार न करता मोठ्या प्रमाणात कर्मचार्यांना कायम करण्यात आले आहे. काही कर्मचारी शारीरिक दृष्ट्या अपात्र झाल्याने त्यांना इतर कामे देण्यात आली आहेत. त्याचाही फटका उपक्रमाला बसत आहे. आर्थिक ताण पडून 
वेतनावरील खर्च हा उत्पन्नापेक्षा दीडपट झाला आहे. चालक नसल्याने सात बस वापरात नाहीत. सध्या सात महिन्यांचा पगार आणि पाच महिन्यांचे सेवानिवृत्ती वेतन थकीत आहे. आजच्या घडीला प्रती किलोमीटरला 22 रुपये 55 पैसे उत्पन्न मिळत आहे, तर 51.33 पैसे खर्च होत आहेत. त्यामुळे प्रती किलोमीटर 28 रुपये 78 पैसे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर उपक्रमाचे खासगीकरण करणे किंवा एसटी महामंडळाकडे वर्ग करणे हाच उपाय असेल, असेही शिफारसीत म्हटले आहे.

परिवहनमधील सध्याचा ताफा - 
टाटा मिडी - 59
मिनी बस - 35
जनबस - 99
व्हाल्व्हो - 10
एकूण - 203
मार्गावर - 36
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unemployment: 'AI मुळे नोकऱ्या गेलेल्या बेरोजगारांना व्हिडिओ गेम्समध्ये गुंतवा!' अँथ्रोपिकच्या सीईओंनी सुचवला धक्कादायक पर्याय

Vaibhav Sooryavanshi: "दोन चेंडूत पिचचा अंदाज आला अन् मी..." ५३ चेंडूत द्विशतक ठोकल्यानंतर वैभव नेमकं काय म्हणाला?

Pune News : पुण्यात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान काळेपडळमध्ये पथकावर विटांचा मारा, तर विमाननगरमध्ये बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्या आठ जणांवर गुन्हा

Maharashtra Rabi Sowing: पाणी नाही, पेरणी नाही! महाराष्ट्रात रब्बी हंगामाची अवघी २७ टक्के पेरणी

Maharashtra Live news : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई; ९ औषधे बनावट, इंडुकेअर फार्मास्युटिकलचा परवाना पुन्हा रद्द

SCROLL FOR NEXT