Demand for ransom 
पश्चिम महाराष्ट्र

डॉक्‍टरकडे मागितली दहा लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : "रुग्णाच्या मृत्यूस तुम्हीच कारणीभूत आहात,' असे सांगून येथील शल्यचिकित्सक डॉ. संजय अनारसे यांना 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शहर पोलिसांनी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. समीर माळवे, रमेश गायकवाड व माधवी गायकवाड (सर्व रा. श्रीरामपूर), अशी आरोपींची नावे आहेत. 


पोलिसांच्या माहितीनुसार, पोटात दुखत असल्याने येथील ऊर्मिला रमेश गायकवाड यांना 21 ऑक्‍टोबर रोजी डॉ. अनारसे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. "एक्‍स-रे'मध्ये त्यांच्या पोटात गोळा आढळून आला. नातेवाइकांच्या इच्छेनुसार डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया केली. नंतर ऊर्मिला यांना पुढील उपचारासाठी संजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्रकृती न सुधारल्याने नगरला हलविले. मात्र, तेथेही प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा संजीवन हॉस्पिटलमध्ये आणले. उपचारादरम्यान 27 ऑक्‍टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

डॉ. अनारसे यांच्या हलगर्जीपणामुळे ऊर्मिला यांचा मृत्यू झाल्याबाबत पोलिसात तक्रार दाखल न करण्यासाठी, तसेच रुग्णालयाची बदनामी टाळण्यासाठी वरील आरोपींनी डॉ. अनारसे यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची, तसेच "ऍट्रॉसिटी'चा गुन्हा नोंदविण्याची धमकी आरोपींनी दिली. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून डॉ. संजय शंकर अनारसे यांनी आज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. 

मुलीस फूस लावल्याच्या गुन्ह्यात 
आरोपीला सक्तमजुरी 

नगर: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या गुन्ह्यात श्रीगोंदे येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजारांचा दंड केला. 
बंडू ऊर्फ प्रकाश पोपट चौधरी (रा. शिंदे, ता. कर्जत), असे आरोपीचे नाव आहे. 
अधिक माहिती अशी ः पीडित मुलगी 19 ऑक्‍टोबर 2016 रोजी परीक्षेला जात असताना आरोपी प्रकाश चौधरी याने दुचाकी अडविली आणि हात धरला. आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून पलसाणा (गुजरात) येथे नेले, अशी फिर्याद पीडितेच्या वडिलांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिली. 
पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याची सुनावणी श्रीगोंदे येथील जिल्हा सत्र न्यायालयात झाली. खटल्यात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी धरीत वरीलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. मोहन कुलकर्णी यांनी बाजू मांडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

IND vs ZIM: भारत आणि झिम्बाब्वेचे खेळाडू दुसऱ्या T20I सामन्यात हाताला काळी पट्टी बांधून का उतरले? जाणून घ्या खरं कारण

सध्या काय करतात 'पंढरीची वारी' चित्रपटातील कलाकार? बालकलाकारासह अनेकांचं निधन; केवळ तिघेच जिवंत

Karjat Lonavala railway block : कर्जत-लोणावळा घाटातील तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगात; २५ ते २८ जुलैदरम्यान अनेक एक्स्प्रेस रद्द

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर! शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार कोण पाहणार? मोदी सरकारने 'या' मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

SCROLL FOR NEXT