demanding that the chicken festival be organized in vita 
पश्चिम महाराष्ट्र

आता विटेकरही म्हणत आहेत... 'चिकन महोत्सव घ्याच...'

सकाळ वृत्तसेवा

विटा - पोल्ट्री व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांतून चालला आहे. चीनमध्ये थैमान घातलेल्या करोना व्हायरसचा  धोका पोल्ट्री कोंबडीच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो, अशी अफवा पसरल्याने काही प्रमाणावर चिकन खाणाऱ्यांच्या वर परिणाम झाला आणि पोल्ट्री व्यवसायावर ओढवलेल्या संकटात वाढ झालीय. त्यामुळे येथे चिकन महोत्सव आयोजित करा, अशी मागणी होत आहे.

ठिक-ठिकाणी पोल्ट्री व्यवसायावर ओढवलेले संकट कमी करण्यासाठी व समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. फक्त पन्नास रुपयांमध्ये शाही चिकन बिर्याणी, ग्रेव्ही चिकन, सुके चिकन, चिकन सिक्‍स्टी फाय व अंडा बॉइल अशा मेजवानीचे बेत होऊ  लागले आहेत. सांगली-मिरज, कऱ्हाड, कोल्हापूर या ठिकाणी चिकन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. यातून चिकन किंवा पोल्ट्रीची अंडी खाणे आरोग्यासाठी घातक नाही, असा संदेश चिकन फेस्टिव्हलच्या माध्यमातून दिला जात आहे. विटा परिसरात सध्या पोल्ट्रीची संख्या कमी होत आहे. 
पोल्ट्री व्यवसायाला पूर्ववैभव प्राप्त व्हावे यासाठी पोल्ट्री व्यवसायात सुधारणा होणे आवश्‍यक आहे. या पार्श्वभूमीवर विटे शहरात चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी विटेकरांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

SCROLL FOR NEXT