Departed to factories with agricultural laborers 
पश्चिम महाराष्ट्र

जत तालुक्‍यातील शेतमजूर बिऱ्हाडांसह कारखान्यांकडे रवाना 

प्रदीप कुलकर्णी

संख : जत तालुक्‍यातील पूर्व भागातील शेतमजूर मोठ्या संख्येने जिल्ह्यासह परजिल्ह्यात ऊस तोडणीसाठी बिऱ्हाडांसह रवाना होत आहेत. नवीन गळीत हंगाम सुरळीत सुरू होत असले तरी, कोरोनापासून दक्षता घेण्याची गरज आहे. कोरोनामुळे ऊस तोड मजूर व कारखानदारही चिंतेत आहेत. ऊसतोड मजुरांना शेतावर आणणे कारखानदारांसमोर आव्हान आहे. 

अधिक मासामुळे दिवाळीपूर्वीच जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील ऊस तोड मजूर रवाना होत आहेत. त्यांची दिवाळी उसाच्या फडातच साजरी होणार आहे. पूर्व भागातील लहान लहान गावे ओस पडू लागल्याचे चित्र आहेत. बाजारपेठेवरही मोठा परिणाम होत आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पंधरा दिवस अगोदर टोळ्या रवाना होत आहेत. चार पाच दिवसांपासून ऊसतोड मुकादम मजुरांना सांगली, रेठरे, साखराळे, कोल्हापूर, उस्मानाबाद व लगतच्या कर्नाटकात ऊस तोडीसाठी मजुरांना ट्रॅक्‍टर, ट्रकमधून बायका, मुले, जनावरे घेऊन निघाल्याचे रस्त्यावर रोज पाहण्यास मिळत आहे. 

प्रत्येक मुकादमकडे 20 ते 25 मजूर(कोयता) असतात. प्रत्येक कोयत्यास 80 हजार ते सव्वा लाखापर्यंत आगाऊ रक्कम ऊसतोडीच्या कामासाठी दिली जाते. सहा महिने, ऊस तोड केली, की काही मजुरांची रक्कम फिटते. तर काहींची रक्कम राहते. उर्वरित रक्कम दुसऱ्या वर्षी फेड केली जाते. 

मजुरांचा तुटवडा 
जत पूर्व भागातील मजूर ऊस तोडीसाठी कोल्हापूर, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद व लगतच्या कर्नाटकात रवाना होत असल्याने ऊस, डाळिंब, द्राक्ष शेतकऱ्यांना मजुरांची तुटवडा भासणार आहे. दुष्काळामुळे ऊस तोडीसाठी जाणे मजुरांच्या पाचवीलाच पुजले आहे. यावर्षीही पावसामुळे काही बदल झालेला नाही.


संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Devendra Fadnavis on Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?; दस्तुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात केला खुलासा...

Pune Crime : पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाला गोळी झाडून संपवलं, कुटुंबाने अपघात असल्याचं भासवलं

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

आधी भुताची कथा मग २: ३० वाजता खिडकीबाहेर लावलं ते गाणं... कोकणात शर्वरीसोबत जयचा प्रॅन्क, ती इतकी घाबरली की...

SCROLL FOR NEXT