sangli political News 
पश्चिम महाराष्ट्र

देशमुख-महाडिक, नाईक-नाईक एकत्र येणार

अस्तित्वासाठीचा झगडा ; प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार

सकाळ वृत्तसेवा

शिराळा : राज्यात सत्तांतराने शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक या युवा नेत्यांना अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना अस्तित्व अबाधित राखण्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून जोमाने काम करावे लागणार आहे. नाईक-देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे शिराळ्याचे राजकारण ढवळून निघाले असले तरी बदलत्या व प्राप्त परिस्थितीनुसार त्यांनी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून त्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो, हे शिराळ्यात अनेक वेळा सिद्ध झाले आहे. शिराळ्याचे राजकारण हे पक्षापेक्षा गटावर जास्त चालते. शिराळा विधानसभा मतदारसंघात सध्या सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक हे चार गट कार्यरत आहेत. या चार गटातील प्रत्येकी दोन गट एकत्र येऊन भाजप व राष्ट्रवादी अशी पक्षबांधणी झाली आहे. या चारी गटाने विधानसभा निवडणूक लढवली असल्याने प्रत्येकाला पक्षापेक्षा आपल्या गटाचे अस्तित्व भक्कम करावे लागणार आहे. तालुक्यात सध्या नाईक विरुद्ध महाडिक-देशमुख असेच चित्र पाहावयास मिळणार आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, बाजार समिती या निवडणुकांच्या माध्यमातून सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांना एकत्र येऊन एकदिलाने काम करावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक हे दोन एकत्र असल्याने त्यांना भाजपला आहे त्या स्थितीत थोपवून ठेवावे लागणार आहे.

नगरपंचायतीत चांगली संधी...

नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवण्याचा निर्धार आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी केला आहे. सत्ताबदल झाल्याने शिराळा नगरपंचायतीवर भाजपची मोहोर उमटवण्यासाठी सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांनी आत्तापासून राजकीय व्यूहरचना करण्यास सुरवात केली आहे. सत्ताबदलाचा परिणाम नगरपंचायतीवर दाखवण्याची संधी महाडिक-देशमुख यांना चालून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT