mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा : स्मशानभुमीची सोय असतानाही मृतदेहावर रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार

सकाळवृत्तसेवा

मंगळवेढा -  शासनाने जनसुविधा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मृतदेहावर अंतिम संस्कार व्यवस्थित करण्यात यावेत म्हणून मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. या निधीतून काम झालेल्या तालुक्यातील मुंढेवाडी येथे स्मशानभुमीची सोय असतानाही मृतदेहावर चक्क रस्त्याच्या कडेला अंतिम संस्कार केले. त्यामुळे या गावातील जुन्या रूढी परंपरेचा विचार करता प्रबोधनाची गरज निर्माण झाली.

या गावातील या समाजातील या परंपरेमुळे अजूनही समाज पुरोगामी रूढी-परंपरेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. मयताची खबर देताना माणूस देवाघरी गेल्याचे सांगणारी मंडळी याच देवाघरी गेलेल्या माणसाला त्याच्या मरणानंतरही चांगल्या पध्दतीने अंतीमसंस्कार करताना दिसत नाही. तालुक्यामध्ये जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पावसाळ्यात व्यवस्थित अंतिम संस्कार व्हावेत म्हणून स्मशानभुमी शेड, संरक्षण भिंत, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदीची सुविधा देताना शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला. 

सभापती प्रदीप खांडेकर व समाजकल्याण सभापती शिला शिवशरण यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसुविधा योजनेच्या निधीतील कामे मंजूर करून घेतली. यामुळे याच निधीतून तालुक्यात मोठ्या प्रमाणात अशी कामे झालेली आहेत. असे असताना मुंढेवाडी गावाच्या पश्चिम भागात असलेल्या ग्रामस्थांकडून मात्र या भागात एखादा मयत झाल्यावर लांबवर असलेल्या स्मशानभुमीत जाण्यापेक्षा त्याला चक्क रस्त्यावर अंतिम संस्कार केले जात आहेत. चौकशी करता गावातील एका समाज घटकाला स्मशानभुमी नसल्याचा दावा ही केला. 

दोन स्मशानभुमी शेड आहेत. शासनाने या ठिकाणी मशीन साठी निधी दिला आहे. परंतु, पश्चिमेकडून मात्र अंतर लांब होत आहे. म्हणून घराजवळ रस्त्याकडेला अंत्यसंकार केले जात आहेत. याबाबत चौकशी केली असता हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. शासनाने दिलेल्या सुविधेचा उपयोग करण्यासाठी येथील ग्रामस्थाच्या मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT