For development work, will BJP be aggressive against the opposition?
For development work, will BJP be aggressive against the opposition? 
पश्चिम महाराष्ट्र

विकासकामांसाठी, विरोधकांविरोधात भाजप आक्रमक होणार का?

बलराज पवार

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गेल्या पंधरवड्यात दोन वेळा महापालिका क्षेत्रात दौरे केले. एकदा पदाधिकाऱ्यांच्या सत्कारासाठी दुसऱ्यांदा उद्‌घाटने, लोकार्पण सोहळ्यानिमित्त. प्रत्येकवेळी त्यांना सत्ताधारी म्हणून काही गोष्टी निदर्शनास आल्या. महापालिकेत भाजपची ब्रॅंडेड सत्ता असल्याचा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला असला आणि जयंत पाटलांपासून भविष्यात असलेल्या धोक्‍यांबद्दल मिश्‍किलपणे उत्तरे दिली असली तरी भविष्यात त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रदेशाध्यक्ष फारसे समाधानी नाहीत. त्यावरुन त्यांनी आपल्या पदाधिकारी, सदस्यांना खडेबोल सुनावले आहेत. पण त्यातून बोध घेवून विकासकामांसाठी आणि विरोधकांविरोधात भाजपचे नेते आक्रमक होणार का? 

राज्यातील सत्ता गेल्याने महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला निधीचीही चिंता तर मोठी आहे. पण विरोधकांच्या भूमिकेत कॉंग्रेस थंड असली आणि राष्ट्रवादी आपले कार्यसाधून घेत असली तरी सध्या आयुक्‍त नितीन कापडणीस हेच विरोधी पक्ष नेते असल्यासारखे भासते आहे. या उलट राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने महापालिकेत विरोधक कॉंग्रेस, राष्ट्रवादीला ताकद मिळाली आहे. पण, ते जागे आहेत का? असा प्रश्‍न आहे. अवकाळी पावसाने रस्त्यांची झालेली दुर्दशा, रखडलेली ड्रेनेज योजना, अमृत योजना, गुंठेवारीतील सांडपाणी निचऱ्याचा प्रश्‍न यावर शामराव नगरात पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलेला दौरा वगळता विरोधक म्हणून कुठलाही आवाज कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून उठलेला नाही. 

पण विरोधक आक्रमक नसल्याने भाजपदेखील सत्ता असूनही आक्रमक दिसत नाही. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीवेळी पूर्ण बहुमत असतानाही भाजपला अखेरच्या क्षणापर्यंत आपलाच सभापती होईल याबाबत धाकधूक होती. यावरुन चंद्रकांत पाटलांनी सदस्यांना जाहीर चिमटे काढले. पुर्ण बहुमत असताना धाकधूक का? सदस्यांना सहलीला का पाठवावे लागते? असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत. याबाबत भाजपच्या नगरसेवकांनी आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त केली आहे. दुसरा दौरा विकासकामांच्या उद्‌घाटनांच्या निमित्ताने कालच (गुरुवारी) झाला. यावेळी मिरजेत त्यांना ट्रिमिक्‍स रस्त्याच्या कामाच्या उद्‌घाटनावेळी रस्त्यावरच साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यातून जावे लागले. यावेळी तेथे नागरिकांनी धरणे आंदोलन केले. रस्त्याची दुरवस्था पाहण्याची नागरिकांची विनंती प्रदेशाध्यक्षांनी धुडकावत उद्‌घाटन करुन निघून गेले. मात्र जाताना त्यांनी कारभाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले असल्याचे समजते. 

दोन्ही दौऱ्यात त्यांनी माध्यमांसमोर आपल्या पदाधिकाऱ्यांचे काम चांगले असल्याचे उसने अवसान आणून सांगितले. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यांच्याच समोर आल्याने वास्तव काय आहे तेही त्यांना समजले. महापालिका क्षेत्रात भाजपचे दोन आमदार आहेत, एक खासदार आहे. महापालिकेत 78 पैकी 43 नगरसेवकांसह पूर्ण बहुमत आहे. तरीही त्याचा म्हणावा तसा प्रभाव दिसत नाही. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, घनकचरा प्रकल्पावरुन प्रशासनाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाशी मुख्यत्वे आयुक्तांशी सत्ताधारी भाजपचे पटत नसल्याचे चित्र गेल्या काही महिन्यात दिसून आले आहे. 

आत्मचिंतन कोण करणार? 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दोन्ही दौऱ्यात आलेले हे अनुभव त्यांच्या सत्तेबाबत बरेच काही सांगून जातात. त्यांनी पहिल्याच दौऱ्यात बहुमत असताना धाकधूक का होते? याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त केली. आता नगरसेवक आत्मचिंतन करणार का? पूर्वी सत्ता असताना जो शंभर कोटींचा निधी आला त्यावरच भाजपच्या विकासाकामांची मदार आहे. त्यातून भक्कम विकासकामे होणार की दिखावू हे आता काळ ठरवेल. सुधीर गाडगीळ यांनी सांगलीत जेथे कधीच रस्ते झाले नाहीत तेथे चकचकीत रस्ते केले आहेत. ते स्वत: मि. क्‍लिन आमदार म्हणून ओळखले जातात. पण त्यांचे कारभारी पारदर्शक कारभार भविष्यात करतील काय? आता निम्मा कार्यकाळ संपत आला आहे. पुन्हा स्वबळावर सत्ता मिळवायची असेल तर पुढच्या अडीच वर्षात कामांचा धडाका दाखवावा लागणार आहे. त्यातच सांगलीत काही कामे दिसतात पण मिरजकरांना अजूनही खड्यातूनच प्रवास करावा लागतो आहे. गटबाजी, लुटालुट आणि भोंगळपणा याशिवाय 22 वर्षात महापालिकेने फार काही विकास पाहिलेला नाही. ही मालिका थांबण्यासाठी भाजपला कंबर कसावी लागेल आणि त्यासाठी चंद्रकांत पाटलांना सांगलीच्या फेऱ्या सतत कराव्या लागतील, असेच चित्र आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT