पश्चिम महाराष्ट्र

साईभक्ताचा वीजचा शॉक लागून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव ः शिर्डीकडे जात असलेल्या दिंडीत हातातील झेंड्याला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन, उतरलेल्या विजेच्या धक्‍क्‍याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तालुक्‍यातील टाकळी येथे हा अपघात झाला. अमोल भगवान कोंढरे (वय 21, रा. वाकद शिरवाडे, ता. निफाड, जि. नाशिक) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

नववर्षानिमित्त वाकद शिरवाडे येथून शिर्डीकडे जात असलेली दिंडी टाकळी येथे एका भक्ताच्या घरी थांबली होती. रात्री साडेदहापर्यंत सर्व साईभक्तांनी जेवण घेतले. साईभक्तांची मुक्कामाची व्यवस्था मराठी शाळेत होती. सर्व जण रात्री अकराच्या सुमारास मुक्कामाच्या स्थळी निघाले, त्या वेळी अमोलच्या हातात झेंडा होता. टाकळी शाळेजवळ रस्ता ओलांडत असताना त्याच्या हातातील झेंड्याचा वीजवाहिनीला स्पर्श झाला. त्यात वीजप्रवाह उतरल्याने विजेचा जोराचा धक्का लागून अमोलचा जागीच मृत्यू झाला. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात त्याच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. 

हे पाहा अखेर जिल्हा परिषदेचे कारभारी बिनविरोध 

दिंडीचालकांनी मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना, वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अमोलचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही शिर्डीकडे जात असतो; मात्र असा अपघात कधी झाला नाही, असे दिंडीतील साईभक्त सांगत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT