Devotees start flocking to Renavit Revansiddha temple 
पश्चिम महाराष्ट्र

रेणावीत रेवणसिद्ध मंदिरात भक्तांची वर्दळ सुरु

गजानन बाबर

विटा : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या रेणावी (ता. खानापूर) येथील श्री रेवणसिद्ध मंदिरात भक्तांची वर्दळ सुरु झाली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आवश्‍यक ती सर्व काळजी घेऊन रेणावी ग्रामस्थ, मानकरी,मंदिराचे विश्वस्त, पुजारी यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दर्शन घेण्यासाठी भक्तांनी शिस्तीचे पालन करावे असे आवाहन श्री रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी केले आहे. 

गुरव म्हणाले, "शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे संपूर्ण मंदिर व परिसराची स्वच्छता केली. मंदिरात प्रवेश करतेवेळी प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे.थर्मल स्कॅनिंग व ऑक्‍सीमीटर द्वारे तपासणी केली जात आहे. योग्य ठिकाणी सॅनिटायझरचा वापर,दर्शन बारीमध्ये सोशल डिस्टंसिंगचे चौकोन आखून अंमलबजावणी सुरू आहे. 

जनजागृती साठी भित्तीपत्रके,डिजिटल बोर्ड तसेच आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.गर्दीच्या वेळी स्पीकर वरून भाविकांना आव्हान करण्यात येत आहे. देवस्थानच्या वतीने शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते आहे. आमदार अनिल बाबर यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व भक्तांनी गेल्या आठ दिवसात दर्शनासाठी उपस्थिती लावली व मंदिरातील सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT