sakal
पश्चिम महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi 2024 : लग्नाची वरात टाळ, वीणा, भजनाच्या साथीने; वारकरी संप्रदायाची जपली परंपरा..

Tried to preserve the tradition of the Warkari Parampara at son's wedding : ढालेवाडीत चव्हाण कुटुंबीयांचा आदर्श.

सकाळ वृत्तसेवा

Dhalewadi : आजकालच्या जमान्यात लग्न, गावदेव, वरात म्हटले की डीजे, साऊंड सिस्टिम, फटाक्यांची आतषबाजी, साऊंड सिस्टिमसमोर नाचगाण्याचा कार्यक्रम प्रामुख्याने असतो. मात्र, याला फाटा देत ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील चव्हाण कुटुंबीयांनी वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्या मुलाच्या लग्नात जपण्याचा एक आदर्श प्रयत्न केला.

ढालेवाडी येथील राहुल एकनाथ चव्हाण यांचा विवाह शनिवारी (ता. १४) पार पडला. गेले तीन-चार पिढ्यांपासून वारकरी संप्रदायात असणारे हे कुटुंब आहे. चव्हाण यांनी मुलाचे लग्न पार पडल्यानंतर काढली जाणारी वरात सांप्रदायिक पद्धतीने अतिशय भक्तिमय वातावरणात गावातून काढली.

टाळ, वीणा, भजन, तुळशी वृंदावन अशा वातावरणात फुगडी खेळत वरात करण्यात आली. कृष्णा महाराज ढालगावकर, मराठे महाराज चोरोचीकर व कृष्णा पाटील महाराज करोली टी यांच्या मार्गदर्शनातून अतिशय भक्तिमय वातावरणात जणू काही दिंडी सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यानंतर नवदाम्पत्याची गावातून वरात काढण्यात आली. परंतु अतिशय मंत्रमुग्ध करणारा आणि धार्मिक सोहळा वाटावा अशा पद्धतीने गावप्रदक्षिणा, करत दिंडी काढण्यात आली.

‘राम कृष्ण हरी, विठ्ठल रुक्माई...’, ‘ज्ञानदेव तुकाराम...’ नामाच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या तालावर वराती मंडळी मंत्रमुग्ध झाले होते. फटाके आणि गुलाल यांच्याऐवजी नवरा-नवरी आणि वऱ्हाडी मंडळींच्या अंगावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण गावभर जणू पंढरीची वारी गावात अवतरली असल्याचे वातावरण तयार झाले होते. वरातीनंतर रात्री हेमंत मराठे महाराज चोरोचीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT