dhananjay desai arrest 
पश्चिम महाराष्ट्र

नगरमधील राडा टळला, धनंजय देसाईंना अटक 

सकाळ वृत्तसेवा

नगर : सीएए व एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी नगरमध्ये सभा आयोजित केली आहे. त्या सभेला विरोध करण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेने रणनीती आखली होती. त्यामुळे शहरात राडा होण्याची शक्‍यता होती. परंतु विरोधापूर्वीच हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांना नगर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

ईदगाह मैदानावर होणार आहे सभा 
नगरमध्ये ईदगाह मैदानावर सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात राज्यस्तरीय निषेध सभा सायंकाळी पाच वाजता होत आहे. या बाबत कालच हिंदू राष्ट्र सेनेने निषेधाचे पत्रक काढले होते. तसेच सभेला विरोध करण्याचा इशाराही दिला होता. ही सभा म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असा आरोप करत धनंजय देसाई यांना या सभेला विरोध केला आहे. सभास्थळी जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतले आहे. 

परवानगी नाकारली 
धनंजय देसाई हे आज नगरमध्ये आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे रॅलीला परवानगी मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून तोफखाना पोलिसांना परवानगी नाकारली. त्यानंतर ते निर्णयावर ठाम राहिले. औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहातून त्यांनी माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 


त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निवडक कार्यकर्त्यांसह पोहचले. त्यांनी ईदगाह मैदानात होत असलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधातील सभेला विरोध दर्शविणारे निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी सभास्थळी जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना बोलावून दाखविला. शहर पोलिसांनी त्यांना समज दिली. तरी देखील ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. 

कार्यकर्तेही ताब्यात 
शहर पोलीस अधीक्षक संदीप मिटके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी धनंजय देसाई यांना ताब्यात घेतले. देसाई यांच्यासह सुमारे दहा ते 15 कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाल्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. 

मंत्री आव्हाड येणार 
सायंकाळी होणाऱ्या सभेसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड येणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्या देसाईंना अटक केली असली, सायंकाळी सभेच्या ठिकाणी वादंग होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT