पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का; धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य न केल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपत जाण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. यासंदर्भातील महाडिक यांच्या हालचालीही वाढल्या असून, भाजपची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्याचा शब्द देण्यात आल्याचे सांगण्यात येते. महाडिक यांनी भाजपत प्रवेश केला, तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असेल. 

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी घेण्याचा दबाव महाडिक यांच्यावर कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांकडून होता. तथापि, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा व प्रेमापोटी त्यांनी राष्ट्रवादीतूनच लढण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष निवडणुकीत धोका होणार असल्याचे त्यांना माहिती होते आणि झालेही तसेच. त्यामुळे महाडिक हे नाराज आहेत. त्यातून पर्यायांचा शोध त्यांनी सुरू केला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच त्यांनी याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकरवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीतच त्यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला होता, तथापि जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे हा निर्णय लांबल्याचे सांगितले जाते. 

राज्यातील राष्ट्रवादीच्या अनेक आजी, माजी आमदार, खासदारांनी भाजप किंवा शिवसेनेची वाट धरली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो, या भागातील साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेकांनी भाजपत प्रवेश केला आहे. आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे हेच भाजपत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या झळकू लागल्या आहेत. आता कोल्हापुरातील महाडिक हेही येत्या सोमवारी किंवा पुढील आठवड्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा करण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवनराजेंना मारलं कुणी? पद्मसिंहांच्या लेकानं १९९० ते २००९ पर्यंतचं राजकारण काढलं बाहेर, षडयंत्र असल्याचा आरोप

Railway Fine: बिनतिकीट प्रवाशांवर मोठा दणका! नियम मोडल्यास दुप्पट पैसे आकारणार; रेल्वे प्रशासनाकडून नवे दंड जाहीर

Pavanraje Nimbalkar : माफीचा साक्षीदार कोण, ज्याच्यामुळे बदलला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल

Jio IPO: भारतातील सर्वात मोठ्या IPO साठी Jio चा सेबीकडे अर्ज! Meta-Googleचाही विश्वास; अंबानींचा मास्टरप्लॅन काय?

एंट्री होणार तितक्यात माझ्या पायजम्याची नाडी तुटली... मग काय केलं? अशोक सराफ यांनी सांगितला तो किस्सा

SCROLL FOR NEXT