पश्चिम महाराष्ट्र

पंढरपुरात होणाऱ्या धनगर मेळाव्याला, धनगर समाजाचाच विरोध

भारत नागणे

पंढरपूर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन त्या प्रमाणे सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी  पंढरपुरात काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांंधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत   माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि काॅंग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर यांनी पुढाकार घेवून आयोजीत केलेल्या मेळाव्याला सकल धनगर समाजाने  विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत गांधी आणि पवारांना धनगर मेळाव्यासाठी पंढरपुरात येऊ देणार नाही, असा इशारा सकल धनगर समाजाचे समन्वयक प्रा.सुभाष मस्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने जोर धरला आहे. त्यातच  आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू हे पंढरपूर ठरले आहे. येत्या  9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी पंढरपुरात टिळकस्मारक येथे धनगर समन्वय समितीच्या वतीने बेमुदत उपोषण आंदोलन केले जाणार आहे.
त्यानंतर माजी मंत्री आण्णा डांगे आणि काॅंग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर यांनाही 11 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर राज्यव्यापी धनगर मेळाव्याचे आय़ोजन केले आहे. या मेळाव्यासाठी काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. 

पंढरपुरात या दोन्ही आरक्षण आंदोलनाची तयारी सुरु असतानाच आज सकल धनगर समाजाने 11 ऑगस्ट रोजी  पवार आणि गांधीच्या उपस्थितीत होणार्या मेळाव्यास  तीव्र विरोध दर्शवला आहे.

राज्यात आणि केंद्रात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची अनेक वर्षे सत्ता असतानाहीत त्यांनी  धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. उलट राजकीय फायद्यासाठी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत  ठेवला. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड,  वसंत पुरके या नेत्यांनीही वेळोवेळी धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हांनी देखील विरोध केल्याचा आरोप मस्के यांनी केला. 

 त्यामुळे पंढरपुरात होणाऱ्या धनगर मेळाव्यास प्रियंका गांधी आणि शरद पवारांना उपस्थित राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. यापुढे धनगर समाजाच्या मेळाव्यास राजकीय व्यक्तींना बोलावू नये. विरोध डावलून मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजकांची राहील असेही यावेळी मस्के यांनी स्पष्ट केले. यावेळी बाळासाहेब बंडगर, काकासाहेब मारकड, माऊली हळणवर, रविंद्र सोनलकर, संजय माने, रायाप्पा हळणवर, सोमनाथ ढोणे, संतोष सुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT