digged pits at bank of Yerla river to prevent sand smuggling; Roads leading to the river are closed 
पश्चिम महाराष्ट्र

वाळू तस्करी रोखण्यासाठी येरळाकाठी चरी; नदी पाञाकडे जाणारे रस्ते केले बंद

संतोष कणसे

कडेगाव (जि. सांगली ) : तालुक्‍यात येरळा नदीतील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसुल विभागाने कारवाई करीत वांगी,शेळकबाव आदी ठिकाणी नदी पाञाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चरी काढून रस्ते बंद केले आहेत. 

सध्या कोरोनामुळे महसूल प्रशासन उपाय योजना व अन्य महसुलच्या कामात व्यस्त आहे.त्याचा गैरफायदा घेत तालुक्‍यातील वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात येरळा नदीतून वाळू उपसा करण्यास सुरुवात केली आहे.तर वांगी वडियेरायबाग , शिवणी,नेवरी , कान्हरवाडी, येतगाव,तुपेवाडी नदीक्षेञातील रस्ते खुले असून या गावातील हद्दीत मोठ्या प्रमाणात वाळु तस्करांनी उच्चाद मांडला आहे.यात महसुल व पोलीस विभागातील काहींच्या पाठिंब्यावर तस्करी सुरु होती. 

तालुक्‍यात ताकारी टेंभु योजनेचे पाणी आल्याचे आर्थिक सुबत्ता वाढली आहे यातुन मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामे सुरू आहेत अनेक शासकिय कामेही सुरु आहेत यासाठी मोठ्या प्रमाणावर उच्च दर्जाच्या येरळा नदीच्या वाळूला मागणी आहे. खर्चापेक्षा दहा पट जादा पैसे वाळु तस्करांना मिळत आहेत.

त्यामुळे रात्रभर वाळु चोरून दिवसा अलिशान गाडीतुन फिरणाऱ्या वाळु तस्करांचा तरूणाईवर प्रभाव पडला जात आल्याने अनेक तरूण वाळु तस्करीमध्ये गुंतले आहेत.यातुन गुन्हेगारी घटनेतही वाढ झाली आहे वाळुच्या वाहनाने आता पर्यत तालुक्‍यातील पंधरा बळी गेले आहेत.तर काही कायमचे जायबंदी झाले आहेत. तर येरळा नदी काठावरील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने हालचाली सुरु केल्याने संबंधित वाळू तस्करांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

तालुक्‍यातील नागरिकांतून 
वाळु तस्करीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून महसुल विभागातील तलाठी व पोलीस प्रशासनास वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.नदीपाञात चरी काढण्याचे काम सुरु आहे.चोरीची वाळु कोणीही खरेदी करु नये. गावा-गावातील वाळुसाठ्याचे पंचनामे करण्याचे गावकामगार तलाठी यांना आदेश देण्यात आले आहेत.

- डॉ. शैलजा पाटील, तहसीलदार,कडेगाव 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT