walchandnar
walchandnar 
पश्चिम महाराष्ट्र

लासुर्णेमधील मुख्याध्यापक दिलीप काळे यांनी घेतली अकरा मुले दत्तक

राजकुमार थोरात

वालचंदनगर - (ता.इंदापूर) जवळील पाटीलवस्ती येथील जिल्हा परिषदेचे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बापूराव काळे यांनी दोन्ही मुलांच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देवुन शाळेतील अकरा मुले दत्तक घेतली असुन या मुलांचा वर्षभरासाठीचा सर्व शैक्षणीक खर्च करणार आहे. यामध्ये पारधी व सर्वसामान्य गरजू कुंटूबातील मुलांचा समावेश आहे.

लासुर्णे मधील मुख्याध्यापक दिलीप काळे यांना दोन मुले आहेत. यातील मोठा मुलगा अमित सैन्य दलामध्ये कॅप्टन पदावर कार्यरत आहे. तर दुसरा मुलगा अक्षय पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.दोघांचे ही वाढदिवस सप्टेंबर महिन्यामध्ये असतात. या दोन्ही मुलांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करण्यासाठी हजारो रुपये खर्च होत होता. चालू वर्षी काळे यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देवून प्राथमिक शाळेतील  नंदिनी  राठोड, राज राठोड, अक्षय गायकवाड, आयुष काळे, सोनाली मोहिते, यश काळे, सुयश काळे,अनिषा काळे,अंजली मोहिते, रूकसाना शेख,सानिका लोंढे  ही अकरा मुले दत्तक घेतली आहेत. या मुलांना ही शिक्षणाची गोडी लागली असून मुले शाळेत नियमित येवू लागली आहेत.  या मुलांना वर्षभर लागणारे सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहेत. मुलांना नुकतेच गणेवश ही दिला आहे. शाळेतील सर्व मुलांना  खाऊचे वाटप केले. 

वैदू समाजातील मुलांना शिक्षणाची गोडी लावणारे मुख्याध्यापक...
दिलीप काळे यांच्या प्रयत्नामुळे लासुर्णे जवळील वैदवाडी येथील वैदू समाजातील मुलांना शिक्षणाची गोडी लागली आहे. अनेक मुलांची भटकंती थांबवून शिक्षणाचे धडे दिले आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT