Discussion of Tara Bhawalkar's name for Nashik Sahitya Sammelan 
पश्चिम महाराष्ट्र

नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी तारा भवाळकर यांच्या नावाची चर्चा

घनशाम नवाथे

सांगली ः लोकसाहित्याच्या अभ्यासिका श्रीमती तारा भवाळकर यांची नाशिक येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. मूळच्या नाशिककर असलेल्या श्रीमती भवाळकर यांनी मराठी साहित्य विश्‍वातील प्रदीर्घ योगदान विचारात घेता त्यांना ही संधी मिळायला हवी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. 

लेखिका वीणा गवाणकर यांनी संमेलन नाशिकला होत असल्याने त्याच्या अध्यक्षपदी श्रीमती भवाळकर यांची निवड योग्य ठरेल अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि राज्यभरातील साहित्यविश्‍वातून या अपेक्षाला बळ मिळाले. ज्येष्ठ साहित्यक मधु मंगेश कर्णिक यांच्यापासून अनेकांनी या अपेक्षेला बळ दिले आहे. गेल्या काही वर्षांत बिनविरोध निवडीचा पायंडा पडला आहे. साहित्य परिषदेच्या शाखांकडून आलेल्या वेगवेगळ्या महामंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन एकमताने निवड जाहीर होते.

त्यामुळे श्रीमती भवाळकर यांचे कोणत्या शाखेकडून नाव पुढे येणार आणि त्याच्या नावाला कसे बळ मिळते यावर अध्यक्षपदाचा मार्ग ठरेल. 
सांगलीत राहून गेल्या चाळीस वर्षांपासून श्रीमती भवाळकर यांनी अखिल भारतीय स्तरावर नाटक, एकांकिका, नाट्यसमीक्षा, लोकसाहित्य, अनुवाद, काव्य, काव्यसमीक्षा आणि वैचारिक लेखन अशा साहित्याच्या विविध क्षेत्रात अखंडपणे योगदान दिले आहे. विविध कोशनिर्मितीत त्यांनी प्राच्यविद्यापंडित रा. चिं. ढेरे यांच्यासह ज्ञानवंतासोबत मोठे योगदान दिले आहे.

निखळ समतावादी, स्त्रीवादी भूमिका घेणाऱ्या श्रीमती भवाळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासह विविध पुरोगामी चळवळीशी सतत नाते सांगितले आहे. जवळपास पस्तीसहून अधिक ग्रंथांचे लेखन, संपादन त्यांनी केले आहे. त्यात प्रामुख्याने लोकनागर रंगभूमी, महामाया, मिथक आणि नाटक, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा, मराठी नाट्यपरंपराः शोध आणि आस्वाद, आचार्य जावडेकर ः पत्रे आणि संस्मरणे (संपादन), लोकसाहित्य ः वाङ्‌मय प्रवाह, मराठी नाटक ः नव्या दिशा, नवी वळणे, तिसऱ्या बिंदुच्या शोधात, लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा, बोरी बाभळी (रा. रं. बोराडे यांच्या स्त्री विषयक कथांचे संपादन व प्रस्तावना), पायवाटेची रंगरुपे (आत्मकथनप लेख संग्रह), आकलन आणि आस्वाद, लोकसंस्कृतीची शोधयात्रा, लोकांगण, लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा, मनातले जनात (ललित लेख संग्रह), नीरगाठ-सुरगाठ (ललित लेख संग्रह), मातीची रुपे, मरणात खरोखर जग जगते (कथा संग्रह), स्त्रीयुक्तीचा आत्मस्वर (संत कवियित्री व स्त्रीमुक्ती), स्नेहरंग (सहवासातील व्यक्तिचित्रे) अशा विपुल ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे.

मराठी नाट्यचळवळीची तटस्थ समीक्षा करताना त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेपासून सहभाग घेतला आहे. अगदी अलीकडे त्यांनी आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या चरित्रग्रंथाचा संकल्प केला आहे. प्रसिद्धीपासून दूर रहात व्रतस्थपणे त्या निरंतर कार्यरत आहेत. 

स्नेहीजनांचा राज्यभरातून आग्रह 
अध्यक्षपदाबाबत समाज माध्यमांमधील चर्चेच्या अनुषंगाने श्रीमती भवाळकर यांच्याशी "सकाळ'ने संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे निरागस हास्य करीत त्या म्हणाल्या,""संमेलनाचे अध्यक्षपद निवडीचा प्रवास आजवर नेहमीच काट्याकुटाचा राहिला आहे. त्यासाठीचे राजकारण आणि संपर्क हे माझं काम नाही. मात्र राज्यभरातील स्नेहीजनांकडून कालपासून दूरध्वनी येत आहेत. त्यांच्याकडून आग्रह होतोय हे खरे आहे. संमेलन स्थळ नाशिकशी असलेल्या माझ्या स्नेहबंधामुळे हा आग्रह होत असावा.'' 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT