पश्चिम महाराष्ट्र

सांगा कसं करावं शेतकऱ्यांनी.. काय परवडायचं... 

अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : शेतकऱ्याला कसं परवडायचं...बाईला 300 रुपये तर गड्याला 500 रुपये हजेरी झालीया... वरून येयचं- जायचं वेगळं पैसे द्यायचं.. मजूर दिवसाचे पाच तास काम करतात... एक एकर ज्वारी काढण्यास सात ते साडे सात हजार खर्च येतो... अजून बांधणी, मोडणी आणि मशिनद्वारे ज्वारी करणं तर वेगळच.. सांगा कसं करावं शेतकऱ्यांनी.. काय परवडायचं.... ही व्यथा विहाळ येथील तरुण शेतकरी विक्रांत बाळासाहेब मारकड यांनी सांगितली. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत, हेच त्यांच्या बोलण्यात दिसून येत होते. 

करमाळा तालुक्‍यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर ज्वारी असून सध्या सुगी हंगाम आहे. यावर्षी वेळेत पाऊस झाल्याने ज्वारीची वाढ चांगली झाली आहे. मात्र, काढण्यास मजूर उपलब्ध होत नसल्याने मिळेल तो रोजगार व गाडी भाडे देऊन शेतकरी मजूर आणत आहेत. ज्वारीची काढणी व खुरपणीसाठी दिवसाला 150 रुपये मजुरी घेणाऱ्या महिला 300 रुपये घेत आहेत. शेतकऱ्यांना एवढा रोजगार देणे परवडत नाही. 
वीट, उमरड, पोंधवडी, कोर्टी, विहाळ, मोरवड, सावडी परिसरातील ज्वारी काढण्यास जामखेड, कर्जत भागातून मजूर येत आहेत. पिकअपला दोन हजार भाडे व मुकादमाला 20 रुपये कमिशन देऊन 40 स्त्री-पुरुष मजूर पिकमधून येत आहेत. सध्या मुकादमाच्या कमिशनस महिलेस 320 तर पुरुषाला 520 शिवाय पिकअपचे भाडे शेतकऱ्यालाच द्यावे लागत आहे. पावसाने ज्वारीचे पीक वाढले असून कणसं भरली नसल्याने उतारा मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा ज्वारीचे काढणे परवडत नाही. 

लोकांना कामं नाहीत 
यावर्षी आमच्याकडे सुगी नसल्याने लोकांना कामं नाहीत. काम मिळालेच तर रोजगार कमी मिळत असल्याने आम्ही या भागात कामाला येत आहोत. सकाळी सातला घरातून निघतो जाण्यास रात्री साडेसात आठ वाजत आहेत. 
- द्वारकाबाई काळे, बटेवाडी, ता. जामखेड, जि. नगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT