congress-ncp-shivsena
congress-ncp-shivsena esakal
पश्चिम महाराष्ट्र

ठरलं! राष्ट्रवादीला 11, कॉंग्रेस 7 तर शिवसेनेला मिळणार फक्त दोनच जागा

सकाळ वृत्तसेवा

मंगळवारी शिवसेना नेत्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या चर्चेत महाविकास आघाडीच्या पॅनेलला तत्वत: मान्यता दिल्याचे समजते.

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ३१६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून आता माघारीकडे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीस कालपासून सुरवात झाली आहे. परंतू माघारीच्या दुसऱ्या दिवशी कोणीही अर्ज माघार घेतला नव्हता. नेते मंडळींच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू असून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, मंगळवारी शिवसेना नेत्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या चर्चेत महाविकास आघाडीच्या पॅनेलला तत्वत: मान्यता दिल्याचे समजते. राष्ट्रवादीला ११ तर कॉग्रेसला ७ व शिवसेनला दोन जागा देण्याचे ठरले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्जाची छाननी झाल्यानंतर मंगळवारी (२६) वैध व अवैध अर्जांची माहिती देण्यात आली. त्यानुसार ३१६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून १६ अर्ज बाद ठरले आहेत. तर ५५ अर्ज दुबार आहेत. छाननीनंतर २६ ऑक्टोंबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. आज अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी कोणीही माघार घेतली नव्हती. मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे आता माघारीसाठी नेते मंडळींना प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या दोन दिवसात म्हणजे दिवाळीनंतर ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अर्ज माघारी घेतले जातील असे चित्र आहे.

दरम्यान, नेते मंडळींच्या चर्चा सुरू असून अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्यात प्राथमिक बैठक झाली आहे. कॉंग्रेसने आठ, शिवसेनेने सहा जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीला बारा जागा हव्या आहेत. महाआघाडीच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली नसल्यामुळे एकत्रित बैठकीतच निर्णय घेतला जाणार आहे. दिवाळीपूर्वी बैठक होण्याची शक्यता असून त्याकडे लक्ष लागले आहे. या बैठकीतच भाजपाला सोबत घ्यायचे की नाही याचा फैसला होणार आहे.

महाआघाडीचे तत्वता जागा वाटप

मंगळवारी शिवसेना नेत्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या चर्चेत महाविकास आघाडीच्या पॅनेलला तत्वत: मान्यता दिल्याचे समजते. राष्ट्रवादीला ११ तर कॉग्रेसला ७ व शिवसेनला दोन जागा देण्याचे ठरले आहे. पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार मानसिंगराव नाईक, अरुण लाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील, महेंद्र लाड उपस्थित होते. कॉंग्रेस व शिवसेनेने आणखी एक जागा मागितली असून त्याबाबत पुन्हा एकत्रित बैठक होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Delhi Liquor Scam: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 'आप' पक्षही आरोपी, ईडीची हायकोर्टात माहिती

Pune News: पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

Haldiram: तुमचा आवडता हल्दीराम ब्रँड लवकरच परदेशी कंपनीच्या हातात जाणार? सर्वात मोठ्या कंपनीने लावली बोली

SCROLL FOR NEXT