solapur collector 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हाधिकारी शंभरकरांनी स्वीकारला सोलापूरचा पदभार 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पदभार स्वीकारला. दुपारी चारच्या दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थिती लावली होती. श्री. शंभरकर यांनी आज डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 
हेही वाचा - अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत 663 कोटींचे कर्जवाटप 
श्री. शंभरकर मूळचे चंद्रपूरचे असून त्यांचे शिक्षण नागपूर येथे झाले आहे. श्री. शंभरकर यांनी यापूर्वी मुंबई उपनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, मुंबई महानगरपालिका, मंत्रालय येथे विविध पदावर काम केले आहे. पुण्यात ते समाज कल्याण आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांची जिल्हाधिकारी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. डॉ. भोसले यांची बदली महावितरणच्या कल्याण विभागाच्या सहव्यवस्थापकिय संचालकपदी झाली आहे. या ठिकाणी रुजू होण्यास डॉ. भोसले अनुत्सुक असल्याचे समजते. अन्य ठिकाणी आपल्याला बदली मिळावी यासाठी देखील प्रयत्न सुरू असून डॉ. भोसले यांना लवकरच अन्य ठिकाणी नियुक्ती मिळण्याची शक्‍यता आहे. 
हेही वाचा - तलाठ्याचा कारनामा ; शेतकऱ्यांच्या जमिनी केल्या गायब 
जिल्ह्यातील भूसंपादन विषयक कामे सुरू आहेत ही कामे गतीने करण्याबरोबरच त्याचा मोबदला मिळवून देणे यास प्राधान्य राहील. जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट यासारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे असून त्यांचा नियोजनबद्ध विकास आणखी गतीने व्हावा यासाठी प्रयत्न राहील. असे त्यांनी सांगितले. समाजकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. नियोजन विकास आराखडा तयार करून त्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल यासाठीही प्राधान्य राहील असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शैलेश सूर्यवंशी, स्नेहल भोसले, उत्तम पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT