district court declare result of kupwad crime case five people life imprisonment in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेप ; फितूर साक्षीदारास नोटीस

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कुपवाडमधील साजन रमेश सरोदे (वय २४) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गजानन प्रकाश गवळी (वय २८), बंड्या उर्फ नरसगोंडा आदगोंडा चिंचवाडे (वय ३२), हणमंत आनंदा कांबळे (वय २४, रा. तिघे उल्हासनगर, कुपवाड), आप्पा ऊर्फ सीताराम पांडुरंग मोरे (वय २४) व मौला अब्दुल मुल्ला (वय ३०, दोघे रा. रा. कापसे प्लॉट, कुपवाड) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे बाळासाहेब देशपांडे यांनी काम पाहिले. 

दरम्यान, या खटल्यामध्ये खोटा पुरावा देणारा साक्षीदार ओमकार शिवाजी जाधव याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, १९ जानेवारी २०१६ रोजी यातील मृत साजन सरोदे हा रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बाहेर जेवण करुन येतो असे म्हणून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो रात्री परत आला नाही म्हणून फिर्यादी आणि साजनचे वडील रमेश सरोदे यांनी तो त्याच्या कोणा मित्राकडे गेला आहे काय याबाबत चौकशी करत होते. त्यावेळी भीमराव सुरेश सरोदे व रोहित विठ्ठल सरोदे हे दुचाकीवरुन आले व त्यांनी रमेश यांना भारत सूतगिरणीच्या पूर्वेस असलेल्या विहिरीच्या पुढे नेले. त्यावेळी रमेश यांना त्यांचा मुलगा साजन हा मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्‍यावर, पोटावर, छातीवर तसेच हातावर जखमा होत्या.

आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने सुमारे ३० पेक्षा अधिक वार केले होते. त्यानंतर रमेश यांनी याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींना काही दिवसात अटक केली. तत्कालनी निरीक्षक अशोक भवड यांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात सुरु होती. याकामी सरकार पक्षातर्फे चौदा साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे व उपलब्ध साक्षीपुराव्यांच्या आधारे आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. गेल्या अनेक वर्षातील सांगलीतील पाच आरोपींना एकाचवेळी मिळालेली ही शिक्षा वैशिष्ट्यपूर्णआहे.

दरम्यान, सर्वसाधारणपणे साक्षीदार फितूर होतात आणि त्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. परंतु या खटल्याचे वैशिष्ट्य असे की, फितूर साक्षीदारास देखील नोटीस काढण्यात आली आहे. या निकालामुळे फितूर साक्षीदारांना चांगलाच धडा शिकवला आहे. यापुढे फितूर होणाऱ्या साक्षीदारांना वचक बसेल, अशी अपेक्षा आहे.

दीड लाखांचा दंड 

न्यायालयाने आरोपीस दीड लाखांचा दंड सुनावला आहे. ती रक्कम साजन सरोदे याच्या वडिलांनी देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामुळे साजन सरोदे याच्या कुटुंबियास काहीसा दिलासा मिळाला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT