District Police Chief inspects sakal
पश्चिम महाराष्ट्र

पोलिस प्रमुखांकडून मतमोजणी केंद्राच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी

विधान परिषदेची निवडणूक 10 नोव्हेंबरला झाली असून मंगळवारी (ता. 14) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी - चिक्कोडी शहरातील आर. डी. महाविद्यालयाला बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी भेट देऊन विधानपरिषद निवडणूक मतमोजणी केंद्राच्या स्ट्रॉंगरूमसह सुरक्षेची पाहणी केली. त्यांनी पोलिस निरीक्षक, अधिकारयांना काटेकोरपणे लक्ष देऊन इतर कोणालाही आत प्रवेश देऊ नये, त्यासाठी स्वतः जबाबदारीने लक्ष घालून गाफील न राहता कडक पहारा देण्याची सूचना केली.

विधान परिषदेची निवडणूक 10 नोव्हेंबरला झाली असून मंगळवारी (ता. 14) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी येथील आर. डी. महाविद्यालयात केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतपेट्या या महाविद्यालयातील विशेष स्ट्रॉंग रूममध्ये आणून ठेवल्या आहेत. परिणामी या ठिकाणी कोणत्याही अनुचित प्रकाराची घटना घडू नये, यासाठी महाविद्यालयाच्या आजूबाजूला कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. रविवारी (ता.12) जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी निरीक्षण करून सर्व ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी, चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT