पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरः दुकानगाळ्याचे आमिष दाखवून डॉक्‍टरला 24 लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - दुकान व ऑफीस गाळे देतो असे सांगून 24 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद डॉ. संदीप प्रभाकर गुंडकल्ली पाटील (41, रा. बागल चौक) यांनी दिली. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे - दिलीप जोतीराव पाटील, धैर्यशिल दिलीप पाटील, धनराज दिलीप पाटील (तिघे रा. रामानंदनगर, जरगनगर) आणि सौरभ सतिश माने (रा. गुरुवार पेठ) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, दिलीप, धैर्यशिल आणि धनराज पाटील या तिघा संशयितांनी बिंदू चौकातील जागेतील दुकान गाळे व 100 स्केअर फूटाचे ऑफीस गाळा विक्री करणार असल्याची जाहीरात दिली. ही जाहीरात वाचून डॉ. संदीप पाटील यांनी त्या तिघांशी 28 ऑगस्ट 2018 ला संपर्क साधला. त्यांनी दुकानगाळे घेण्याची तयारी दाखवली. पण या तिघांनी बिंदू चौकात कोणत्याही प्रकारचे दुकानगाळे तयार केले नव्हते. त्या तिघांनी सौरभ माने यांच्या जागेत नवीन दुकानगाळे केल्याचा प्लॅन तयार केला. त्यानंतर निबंधक कार्यालयात या चौघांनी 27 नोव्हेंबर 2018 ला दस्त करून बनावट घोषणापत्र केले.

त्याआधारे धनादेशाद्वारे 17 ऑक्‍टोबर 2018 अखेर वेळोवेळी डॉ. पाटील यांच्याकडून 24 लाख रूपये घेऊन त्यांची फसवणूक केली. असे डॉ. संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे. त्यानुसार दिलीप, धैर्यशिल, धनराज पाटीलसह सौरभ माने या चौघांवर 24 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा जुना राजवाडा पोलिसात दाखल झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT