rayat donation.jpg
rayat donation.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ  "रयत"ला वीस लाख रूपयांची देणगी...विजयमाला कदम यांचे दातृत्व

सकाळवृत्तसेवा

कडेगाव (सांगली)- भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदमयांनी व्यक्तीगत स्तरावर रयत शिक्षण संस्थेस 20 लाख रुपयांची देणगी दिली. 

सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विजयमला कदम यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचेकडे 20 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,कर्मवीरांच्याविचारांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या अनेक व्यक्ती रयतच्या या प्रवाहात सक्रीय झाल्या व कर्मवीरांनी लावलेला हा शिक्षणाचा नंदादीप तेवत ठेवला. त्यात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.पतंगराव कदम हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्यम्हणुन अनेक वर्षे कार्यरत असताना त्यांनी वारंवार संस्थेसाठी सर्वतोपरी मदत केली.खऱ्या अर्थाने डॉ.पतंगराव कदम यांनी शिक्षणक्षेत्रातकर्मवीरांचा कृतीशील वारसा जपला असे सांगत शरद पवार यांनी डॉ.पतंगराव कदम यांच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एन.डी.पाटील,डॉ.अनिल पाटील,मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ.विश्वजित कदम,डॉ.अस्मिता जगताप आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT