corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका : शिवप्रतिष्ठानचे आवाहन

सकाळवृत्तसेवा

सांगली- कोरोना च्या संकट काळात अधिकृत परवाना घेऊन जे नागरिक जिल्ह्यात येत आहेत, त्यांना माणुसकीने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. मात्र जे बेकायदेशीर गावात येत आहेत त्यांच्याविरूद्ध तक्रार करावी असे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे कार्यवाह नितीन चौगुले यांनी केले आहे. 


"कोरोना' विषाणूचा फैलाव सर्वत्र झाला असून वातावरण गढूळ निर्माण झाले आहे. प्रत्येकजण एकमेकाकडे संशयाने बघू लागला आहे. प्रत्येकाला स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी आहे. परंतू सध्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे मुंबई, पुणे येथे अडकलेले नागरिक गावी परत येत आहेत. शिक्षण आणि नोकरीनिमित्त गेलेले नागरिक प्रशासनाची परवानगी घेऊन आणि वैद्यकीय तपासणी करून येत आहेत.

जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातोय. हा शिक्का पाहून नागरिक त्यांना तुच्छतेने वागवत आहेत. सध्या लॉकडाउन शिथील केल्यानंतर मुंबई, पुणेसह अन्य जिल्ह्यातून अनेक नागरिक येथे स्थलांतरीत होत आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. हे सर्वजण संकटात सापडल्यामुळे आणि पर्याय नसल्यामुळे इकडे येथे आहेत. त्यामुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची गरज आहे. 


गतवर्षी महापुराच्या संकटात सापडल्यानंतर मुंबई, पुणेसह अन्य जिल्ह्यातील बांधवांनी आपल्याकडे शेकडो ट्रक भरून धान्य आणि इतर मदत पाठवली होती. तसेच सांगलीकर देखील कामानिमित्त तिकडे गेले की हक्काने त्यांच्याकडे जाऊन त्रास देतात. त्यामुळे आज ते नाईलाजाने आपल्या हक्काच्या घराकडे येत असतील तर तुच्छतेने वागणूक देऊ नये. सावधानता बाळगून प्रत्येकाने आपले वागणे बदलण्याची गरज आहे. अधिकृत परवाना घेऊन येणाऱ्यांना सन्मानाची वागणूक द्या. तर बेकायदेशीरपणे येणाऱ्यांविरूद्ध जागरूक म्हणून तक्रार करावी असे आवाहनही शिवप्रतिष्ठानतर्फे श्री. चौगुले यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT