सांगली-मुस्लिम धर्मियांची पवित्र हज यात्रा 17 जूनपासून सुरू होत आहे. जगभरात पसरलेल्या "कोरोना' व्हायरसमुळे यात्रा रद्द होणार अशी अफवा पसरवली जात आहे. परंतू ही यात्रा सामान्य नसून सौदीमध्ये त्याची जोरात तयारी सुरू आहे. त्यामुळे हज यात्रेकरूनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, ""हज यात्रा 2020 साठी देशाचा कोटा 1 लाख 76 हजार ठरवला आहे. परंतू जवळपास दोन लाख यात्रेकरू जातील. महाराष्ट्रातील 28 हजार 300 जणांनी यात्रेसाठी अर्ज केला. महाराष्ट्राचा कोटा 12 हजार 500 यात्रेकरूंचा आहे. सांगलीतून 701 जणांनी अर्ज केला असून 251 जणांचा नंबर लागला आहे. आणखी काही जादा जागा मंजूर होतील. पंतप्रधान मोदींनी 25 हजार जागा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार राज्यात आणखी 4 हजार जणांना संधी मिळेल. तर सांगलीला शंभर ते दीडशे जादा जागा मिळतील. हज यात्रेकरूंसाठी पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण सुरू केले होते. परंतू कोरोना व्हायरसमुळे प्रशिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.''
ते पुढे म्हणाले, ""हज यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी केवळ प्रशिक्षण थांबवले आहे. ते एप्रिलमध्ये सुरू होईल. परंतू काहीजण हज यात्रा रद्द झाल्याची अफवा पसरवत आहेत. परंतू ती अफवाच आहे. ही यात्रा म्हणजे इस्लामचा पाचवा स्तंभ आहे. यात्रा सामान्य नाही. सौदीमध्ये त्याची जोरदार तयारी सुरू आहे. यात्रेपूर्वी निश्चितच कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणले जाईल. यात्रेकरूकडून तीन टप्प्यात पैसे घेतले जातात. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 81 हजार रूपये जमा केले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील एक लाख 20 हजार रूपये यात्रेकरूंनी वेळेत जमा करावेत. अफवांवर विश्वास ठेवून पैसे जमा केले नाहीतर यात्रेला जाता येणार नाही. यात्रेची पहिली फ्लाईट 17 जून निघणार असून शेवटची फ्लाईट 7 जुलैला आहे. तर 4 ऑगस्ट हा हजचा मुख्य दिवस आहे.''
हज समिती सदस्य आकाशा मुल्ला, शहानवाज सौदागर, भाजपचे दीपक शिंदे, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.
कॉंग्रेसने हाजींना बदनाम केले-
""हज कमिटी ऑफ इंडिया ही स्वायत्त संस्था आहे. समितीला कधीही सबसिडी मिळाली नाही. परंतू कॉंग्रेस सरकारने सबसिडी दिली जाते असे सांगून बदनाम केले आहे. वास्तविक हाजींना सबसिडी मिळत नसून कॉंग्रेस सरकार एअर इंडियाला सबसिडी देऊन त्यांना पोसण्याचे काम करत होते. भाजप सरकारने सबसिडी बंद करून हाज यात्रेकरूवरील कलंक मिटवला आहे'' असे श्री. सिद्दीकी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.