Don't worry Mom, we are safe!... says oustate labours 
पश्चिम महाराष्ट्र

परेशान मत हो मॉं, हम सुरक्षित हैं ! 

दीपक पवार

इटकरे (जि सांगली) : "आधे पेट जियेंगे, लेकीन बेटा घर लौट आ', "परेशान मत हो मॉं, इधर कामधंदा है, हम सुरक्षित हैं, महाराष्ट्र के भाई हमारा ख्याल रखते हैं!' हा संवाद आहे इथं काम करणारा मजूर आणि दूर हजारो किलोमीटर परप्रांतात राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचा. त्यांचा हा संवाद परप्रांतियांना महाराष्ट्रात मिळणारी चांगली वागणूक अधोरेखित करणारा ठरला आहे. 

कोरोना संसर्गाची भीती व लॉकडाउनमुळे अनेक हात बेकार झालेत. उद्योग धंदे बंद आहेत. या ठिकाणी काम करणारे अनेक परप्रांतीय मजूर घराकडे निघालेत. "पुढे काय' याचा विचार न करता त्यांनी गावची वाट धरली. "दोन घास कमी खाऊ, पण घरी जाऊ. तिकडेच राहू' असे म्हणून काहींनी महाराष्ट्राला कायमचा रामराम ठोकला. पण दुसऱ्या बाजूला काही मजुरांनी आपापल्या राज्यात असणारी रोजगाराची टंचाई, कमी शिक्षण, काम करत असलेल्या क्षेत्रातील कामाचा तिकडे असलेला अभाव. जरी काम उपलब्ध असले तरी तेथे मिळणारा अत्यल्प मोबदला याचा विचार करून "घरी गेलो तर दोन घास कमी नव्हे, ते देखील मिळणे मुश्‍कील होईल' असे म्हणत इथंच राहणं पसंत केलं आहे. 

वृद्ध आई-वडिलांना येथे काम करणाऱ्या मुलांची काळजी आहे. "कोरोना'चा वाढता व्याप लक्षात घेऊन हे वृद्ध मुलांनी गावी यावे. आपल्या सोबत रहावे यासाठी विनवण्या करीत आहेत. मात्र काही मजुर आई-वडिलांना येथील परिस्थितीची माहिती देत समजूत काढत आहेत. इथं परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रातील लोक, प्रशासन आमची काळजी घेत आहे. इथं कामधंदा चांगला आहे. आम्ही इथं राहिलो तरच तुमचा नीट सांभाळ करु शकतो, असं सांगून धीर देत आहेत. 

20 ते 30 वयोगटातील बांधकाम, फर्निचर, रंगकाम, लघुउद्योग या क्षेत्रातील मजुरांनी भवितव्य आणि कुटुंबीयांचा विचार करून इथंच थांबणं पसंत केलंय. काम करत असलेल्या ठिकाणच्या मालकांकडून, ठेकेदाराकडून, राहत असलेल्या शेजाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. "हातातलं काम सोडून रस्त्यात कुठे तरी भरकटत राहण्यापेक्षा आहे तिथं सुखरुप राहणं' हाच पर्याय स्वीकारला आहे. 

गावी परतलेल्यांचे हाल... 
महाराष्ट्रातून कुटुंबीयांसह उत्तरप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर परत गेले आहेत. तिथल्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्राने जेवणाची व्यवस्था केली, चांगलं सहकार्य केलं, मात्र इथले प्रशासन रस्त्यावर अडकलेल्या मजुरांना साधे पाणी सुद्धो देऊ शकत नाही, अशी खंत तेथील मजुरांनी बोलून दाखवली आहे. या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

Aquarius success astrology: कुंभ राशीवाल्यांनी 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा! वर्षभर अपघात टळतील अन् यशाची दारं उघडतील

Sports Tournament in 2026: क्रिकेट ते फुटबॉल वर्ल्ड कप... २०२६ मध्ये क्रीडा स्पर्धांची सर्वात मोठी पर्वणी; 'या' तारखा नोट करून ठेवा

आता गणिताची कोडी सोडवणार अयोध्येचे 'राम मंदिर'; उत्तर प्रदेशातील इयत्ता चौथीच्या पुस्तकांमध्ये मोठे बदल

SCROLL FOR NEXT