Chandrahar Patil's alliance with NCP? ; Jayant Patil visited his home at Bhalwani 
पश्चिम महाराष्ट्र

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादीशी सलगी? ; जयंत पाटील यांनी भाळवणी येथे दिली घरी भेट

दीपक पवार

आळसंद (जि. सांगली) : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सलगी पुन्हा वाढल्याचे स्पष्ट होते आहे. त्याचा प्रत्यय भाळवणी येथे झालेल्या कार्यक्रमात आला. भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटीतर्फे शेतकरी सभागृह व ऊस तोडणी मशीन लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते.

खरंतर भाळवणी सोसायटी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाच्या तब्यात असणारी संस्था आहे. चंद्रहार पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

कार्यक्रमानंतर मंत्री श्री. पाटील चंद्रहार पाटील यांच्या निवासस्थानी भेटले. चंद्रहारचे चुलते प्रतापराव घोरपडे-पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस मंत्री पाटील यांनी केली. पाटील हे विट्यात कुस्ती संकुल उभारत आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेऊन कुस्ती संकुलास आर्थिक मदत करण्याची करण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

सन 2002 मध्ये चंद्रहार पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर भाळवणी जिल्हा परिषद गटातून निवडून आले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांचा अल्पमतांनी पराभव केला. जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर चंद्रहार यांचा चंद्रदोय झाला. आमदार अनिल बाबर यांच्याशी निष्ठेने काम करीत राहिले. 

दरम्यान, या काळात पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मध्यंतरी विधान परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेवर वर्णी लागवी. त्यासाठी प्रयत्नशील होते. चंद्रहार पाटीलला कुस्ती क्षेत्रात मानणारा वर्ग मोठा आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT