Dr. Babasaheb Ambedkar Statue Palus Municipality esakal
पश्चिम महाराष्ट्र

Babasaheb Ambedkar : पलूस पालिकेच्या जागेत रात्री अज्ञाताने बसवला डॉ. आंबेडकरांचा पुतळा, वाद निर्माण होण्याची शक्यता!

डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनोळखींनी उभा केलेला पुतळा काढू नये, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

पलूस : शहरात तासगाव-कऱ्हाड महामार्गानजीक पालिकेच्या (Palus Municipality) जागेत अनोळखींनी मंगळवारी (ता. ९) रात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा (Dr. Babasaheb Ambedkar statue) बसवला. तो काढावा, असे प्रशासनाचे मत, तर पुतळा काढू नये, असे अनुयायांचे मत होते. रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही.

गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी स्मशानभूमी लगत बगीचात (आय लव्ह पलूसकर पॉईंट) डॉ. आंबेडकर यांचा पुतळा अनोळखींनी बसवला. प्रशासनाने दक्षता म्हणून बंदोबस्त ठेवला. शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते आले होते. प्रशासनाने चर्चा केली.

तहसीलदार निवास ढाणे, पोलिस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पलूसच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे, युवराज सरनोबत, तसेच ॲड. के. डी. कांबळे, बोधिसत्व माने, सुशील गोतपागर, राजेश गायगवाळे, अविनाश काळेबाग, विजय गावले, राजेश तिरमारे, महादेव होवाळ, विशाल तिरमारे, मिलिंद वाघमारे, अनिल कांबळे व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ती निष्फळ ठरली. रात्री पुतळ्याच्या ठिकाणी अनुयायी मोठ्या संख्येने जमले.

डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनोळखींनी उभा केलेला पुतळा काढू नये, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत पालिका प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दिली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

माेठी बातमी! 'बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई वाढणार'; शासनस्तरावर हालचाली सुरु, राज्यभरात हल्ल्यांत वाढ..

बस दुर्घटनेतील मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या १८ जणांचा समावेश; घरात कुणी उरलंच नाही

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उद्या मिळणार प्रत्येक शेतकऱ्यास २००० रुपये; शेतकरी सन्मान निधी योजना, राज्य सरकारचाही २००० रुपयांचा हप्ता महिनाअखेर जमा होणार

CA Success Story:'रिक्षा चालकाची लेक बनली सीए'; आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवलं, भावाचे मिळाले पाठबळ..

SCROLL FOR NEXT