पश्चिम महाराष्ट्र

Video : बाप हो देव पाहिला का देव ?

सिद्धार्थ लाटकर

सातारा : देव दगडात नसून तो माणसांत आहे हे संत गाडगेबाबा यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. आज (ता. रविवार, 23 फेब्रुवारीस) गाडगेबाबा यांची जयंती आहे. अंधश्रद्धा निमुर्लन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनीही प्रश्‍न तुमचा उत्तर डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे या कार्यक्रमातील तेराव्या प्रश्‍नात संत गाडगेबांच्या विचारांचे उदाहरण दिले आहे.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी- परंपरा दूर करण्यासाठी संत गाडेगाबांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा- धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्‍यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.

डॉ. दाभोलकर यांना प्रश्‍न विचारला जातो. तुम्ही धर्म नाकारता मग देव ही नाकारता का ? यावर डॉ. दाभोलकर म्हणतात याचे उत्तर मला सविस्तर देणे गरजेचे आहे. परंतु याचे मी तुम्हांला गोळेबंध उत्तर देतो. तुम्ही देव नाकारता का असा प्रश्‍न ज्यावेळीस तुम्ही मला विचारता त्यावेळेला तुम्ही देवाची व्याख्या केलेली नाही. तुम्ही जर मला असे विचारला असते जगाच्या निमिर्ती करणारा देव तुम्ही नाकारता का ?, जगाचे नियंत्रण करणारा देव नाकारता का ? चमत्कार करणारा देव नाकारता का ? नवसाला पावणारा देव नाकारता का ? तर मी निसंधीग्धपणे म्हटले असते हो हा देव मी नाकारतो.

तुम्ही मला जर असे विचारले असते गाडगेबाबांनी देवाची कल्पना जी स्विकारली ती नाकरता का ? असे म्हणून डॉ. दाभोलकर पुढे म्हणतात तुम्हांला माहिती नसेल ती गोष्ट सांगतो. गाडगेबाबा 30 वर्ष आषाढी आणि कार्तिकी एकादाशीला पंढरपूरला गेले. एकदा ही उपवास केला नाही. एकदाही देवळात गेले नाहीत. लोकांनी खराब केलेला चंद्रभागेचा किनारा स्वतःच्या खऱ्याट्याने साफ करायचे. रात्री किर्तनाला उभे राहायचे. समोरच्या हजारो श्रोत्यांना विचारायचे बाप हो देव पाहिला का देव ? लोकांना वाटायचे कमाल आहे आम्ही इंथ कशाला आलो. ते म्हणायचे पाहिला जी. बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पाहिला. तुमचा कोठे राहतो. लोक म्हणयाचे आमचा देव देवळात उभे राहतो. वीटेवर उभा आहे. रंगाने सावळा आहे. कटीवर हात आहेत. त्याच्या बाजूला रखमाई आहे. कमाल आहे तुमचा देव देवळात राहतो. माझा देव माझ्या मनात राहतो. तरी लोकांना काही कळायचे नाही.

 सविस्तर वाचा संत गाडगेबाबा यांच्या विषयी 

मग बाबा विचारयाचे तुम्हारे देवालय अंघोळ करते की नाही. लोक म्हणायचे करते तर. बाबा म्हणायचे तुम्हारे देवालय अंघोळ कोण घालते. लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी. तुम्हारे देवालय स्वतःची अंघोळ स्वतःला करु शकत नाही तो तुम्हांला तुमच्या भाग्याची अंघोळ काय घालणार. 
तुम्हारे देवालय धोतर नेसते का ? लोक म्हणायचे नेसते तर. बाबा म्हणायचे तुम्हारे देवालय नेसूचे धोतर नेसू शकत नाही ते तुम्हांला तुमच्या भाग्यचे वस्त्र ते काय देणार. बाबा म्हणायचे तुम्हारे देवालय नैवेद्य दाखवते की नाही ? लोक म्हणायचे हो दाखवते. बाबा म्हणायचे नैवैद्य दाखवून नंतर काय करते. लोक म्हणायचे हातात काठी घेऊन बसते. बाबा विचारायचे कशाला. लोक म्हणायचे कावळा कुत्रा ते नैवैद्य खायला येईल त्याला हाकायला. बाबा म्हणायचे जे तुमचे देवालय त्याच्यासाठी वाढलेले स्वतःचे नैवेद्याचे स्वतः रक्षण करता येत नाही ते तुमच्या आयुष्याचे रक्षण ते काय करणार. 

पूढे बाबा लाख मोलाचे प्रश्‍न विचारायाचे जित्ता जागता देव कोणी पाहिला का जित्ता जागता देव. आपण कोणी तो पाहिलेला नसतो. लोक कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पाहयाचे. गाडगेबाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा, चेहरा रापलेला, पांढरी शुभ्र दाढी, अंगावर जाडे भरडे खादीचे कपडे, पाय अनवाणी त्याच्याकडे बोट दाखवत बाबा म्हणायचे हे भाऊराव पाटील बघा हे म्हारा मांगाच्या पोरांना शिकवयाचे काम करते त्याला देव म्हणा. ते गांधी बाबा बघा ते देशासाठी मर मर मरते त्याला देव म्हणा. अरे अडाण्याला शिक्षण द्यावे, आजाऱ्याला औषध द्यावे, बेघरला घर द्यावे, रंजल्या गंजल्याची सेवा करावी, मुक्‍या प्राण्यांवर दया करावी. बाप हो देव याच्यात राहते. बाप हो देव देवळात राहत नाही, देव आपल्या मनात राहते. देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते. म्हणजे तुम्ही देव काय मानता याच्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे उत्तर अवंलबून आहे असे डॉ.दाभोलकर नमूद करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट,जहीर शेख अडचणीत; तरुणीच्या नव्या तक्रारीने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar:भविष्यात कागदी नोटांऐवजी डिजिटल कॅश; ‘सीबीडीसी’च्या व्यवहारासाठी इंटरनेटचीही आवश्यकता नाही

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा कायमचा थांबणार लाभ; मेपासून पात्र महिलांनाच दरमहा १५०० रुपये, ‘या’ वेबसाईटवर पाहा तुमचे नाव, वाचा...

Marathwada News: मराठवाड्यातील जलसाठा प्रकल्पांत ५५ टक्के उपयुक्त पाणी; जायकवाडी ५८% भरलेले

Chhatrapati Sambhajinagar: हर्सूल तलावामध्येचार युवकांचा मृत्यू ; दोन मित्रांसह तिघे बुडाले, तर एकाने मारली उडी

SCROLL FOR NEXT