Dr. Syed's Shole style agitation, and the mayor immediately ran to Mirza 
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. सय्यद यांच्या शोले स्टाईल आंदोलन केले, अन महापौर तातडीने मिरजेकडे  धावले

प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली) : शहरातील मध्यवस्तीतील किमान सहा ते सात हजार नागरिकांना गेल्या सहा महिन्यांपासून पाणी टंचाईचा त्रास होत असेल आणि महिला दिनादिवशी महिला नगरसेविकेस पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावे लागते ही बाब लाजिरवाणी आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये सुधारणा झाली नाही, तर आपण स्वतः पाण्याच्या टाकीवर आंदोलन करू, असा इशारा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आज मिरजेत दिला.

नगरसेविका डॉ. नर्गिस सय्यद यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्यानंतर महापौर तातडीने मिरजेत दाखल झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन स्वतः आंदोलन करण्याचा इशारा देताच डॉ. सय्यद यांच्या प्रभागात लगेचच पाण्याचे टॅंकर गेले आणि तातडीने पाणीही सोडण्यात आले. 

शहराची मध्यवस्ती असलेल्या गुरुवार पेठ, बुधवार पेठ, गोठण गल्ली, मुजावर गल्ली, जवाहर चौक, बसवेश्वर चौक, अंबी वाडा येथील किमान सात हजार नागरिक गेल्या सात महिन्यांपासून पाणी टंचाईच्या संकटात आहेत. अमृत योजनेचे काम झाल्यानंतर ही टंचाई जाणवू लागली आहे. दिवसातून केवळ पंचेचाळीस मिनिटे पाणी त्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे केवळ पाईपमधून हवाच येत राहिल्याने वैतागलेले नागरिक नगरसेवकांना जाब विचारू लागले.

अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचा अनुभव येताच डॉ. सय्यद यांनी आज अचानकच येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तेथूनच महापौर, आयुक्त आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर सर्वांची धावपळ सुरू झाली. महापौर सूर्यवंशी हे काही मिनिटात तेथे आले आणि टाकीवर जाऊन त्यांनी डॉ. सय्यद यांची समजूत काढली आणि त्यांना खाली आणल्यानंतर अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंत डॉ. सय्यद यांनी हे आंदोलन मागे घेतले आणि त्यानंतर काही वेळातच टंचाईग्रस्त परिसरात पाणीही पोहोचले. 


वैतागून आंदोलन करावे लागले
गेल्या किमान सहा महिन्यांपासून पाणीटंचाईबाबत पाठपुरावा करते आहे. नागरिकांच्या समस्येबाबत अधिकारी जबाबदारी झटकत असल्यानेच वैतागून आपणास हे आंदोलन करावे लागले. 
- डॉ. नर्गिस सय्यद, नगरसेविका 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT