पश्चिम महाराष्ट्र

सीमाभागातला मराठी प्रेमी प्रा. डॉ. वसंत जोशी  

सकाळवृत्तसेवा

प्राचीन मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. वसंत स. जोशी (वय 87) यांचे पुणे येथील निवासस्थानी गुरुवारी (ता. 16) निधन झाले. त्यांच्या निधनाने सीमाभागातील साहित्य वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला. सीमाभागातला मराठी प्रेमी हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. 

मूळचे अक्कोळ (ता. चिक्कोडी) येथील डॉ. जोशी यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण निपाणी, कोल्हापूर व पुणे येथे झाले. 1968 मध्ये "एकनाथकृत भावार्थ रामायणाचा विवेचक अभ्यास" विषयावर त्यांनी केलेली पीएच. डी. ही शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील पहिली होती. 1961 ते 65 पर्यंत ते अर्जुननगरच्या देवचंद महाविद्यालयात व 1990 अखेर सेवानिवृत्तीपर्यंत किसनवीर महाविद्यालय, वाई येथे पदव्युत्तर विभागाचे प्रमुख होते. 

उमेदवारीच्याकाळात डॉ. जोशी यांनी दैनिक सत्यवादीत उपसंपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके यांचे लेखनीक म्हणून काम केले. प्राचीन मराठी साहित्याचे संपादन व संशोधन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. महानुभव आणि संत वाङमयावर त्यांनी विपुल लेखन केले. महानुभव संत, ज्ञानदेव चिंतन, मराठी गौळण, संशोधन साधना, मराठी भाषा व साहित्य संशोधन खंड 1 व 2 आदी किमान 10 संशोधनात्मक पुस्तकांचे लेखन व संपादन त्यांनी केले. त्यांच्या ग्रंथांना मराठी अभ्यासकांनी गौरविले व विविध पुरस्कारही मिळाले. पंजाब आणि हैद्राबादमधील मराठी हस्तलिखिताची त्यांनी संपादलेली सूची ही मौलिक संदर्भ साधन म्हणून मान्यताप्राप्त आहे. 
मृदू, मितभाषी असूनही मार्मिक आणि मिस्किल टिकाटिपणी करण्यात हातखंडा असलेल्या डॉ. जोशी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, कार्यवाह आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक म्हणून 1985 ते 1988 अखेर काम केले. तर भारत इतिहास संशोधन मंडळाचे कार्यकारीणी सदस्य व 1974 ते 77 या काळात मंडळाच्या त्रैमासिकाचे संपादक म्हणून काम केले. नवभारत या वाईहून प्रसिद्ध होणाऱ्या वैचारिक मासिकाच्या संपादक मंडळातही त्यांनी काम केले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; सरकारच्या कामकाजावर ठेवणार बारीक नजर

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Delhi Police Officer Resignation :'जंतर-मंतरवरील पोरांना मारू शकत नाही'; दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्याने दिला राजीनामा? व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT