पोटनिवडणूक sakal
पश्चिम महाराष्ट्र

महापालिकेच्या रिक्त जागेसाठी १२ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

महापालिकेतील प्रभाग सोळा मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार

सकाळ वृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्या रिक्त पदाच्या पोट निवडणुकीसाठी 12 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक आयोगाने आज ही घोषणा केली. सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेतील प्रभाग सोळा मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महानगरपालिका मधील रिक्त असलेल्या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसह धुळे, अहमदनगर, नांदेड-वाघाळा, पनवेल आणि मीरा भाईंदर या महापालिकेतील रिक्त जागांचा समावेश आहे.

सांगलीचे माजी महापौर काँग्रेस नेते हारुण शिकलगार यांचे गतवर्षी निधन झाले. महापालिकेच्या प्रभाग १६ मधून ते निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर अद्याप पोटनिवडणूक झाली नाही. ही निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे महापालिका क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

राज्यातील कोराची दुसरी लाट ओसरल्यानंतर निवडणुकांची हालचाल आता सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांमधील रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. याचाच पहिला टप्पा म्हणून १२ नोव्हेंबर रोजी या रिक्त असलेल्या जागांच्या मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT