Drama council elections in a playful environment
Drama council elections in a playful environment 
पश्चिम महाराष्ट्र

बरं का, इथं चांगलं "बि"घडतं...नाटकवाल्यांमुळे नाही झाला तमाशा

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नाटय क्षेत्रातील शिखर संस्था अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या नगर जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया सुरू आहे. इथे नेहमीच कोणत्याही कारणावरून तमाशा होत असतो. या वेळी मात्र, सर्वांनीच  सामंजस्याची भूमिका घेतली. आणि विरोध न करता निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. त्यामुळे इथं चांगलं बी घडतं बरं का असा जणू मेसेजच या निवडणुकीतून टीकाकारांना दिला.

ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश लोटके यांच्या नेतृत्वाखाली 19 सदस्यांचा नटराज पॅनल बिनविरोध निवडून आला अशी माहिती पॅनल प्रमुख शशिकांत नजान यांनी दिली. 4 मार्च रोजी पदाधिकारी निवड होणार आहे.

 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नगर जिल्हा शाखेची कार्यकारी मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. निवडणूक अधिकारी म्हणून शेखर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रत्यक्ष मतदान 8 मार्च व निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार होता. तत्पूर्वी 19 जागेसाठी दाखल झालेल्या 22 पैकी तीन उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली अशी माहिती निवडणूक अधिकारी वाघ यांनी दिली आहे.


यावेळी प्रा. मधुसूदन मुळे, पी.डी.कुलकर्णी, मोहन सैद, सदानंद भणगे, प्रकाश धोत्रे, दीपक शर्मा, अनंत जोशी, क्षितिज झावरे, रितेश साळुंके, सुनील लोटके, जयंत येलुलकर, सागर मेहेत्रे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ऊर्मिला लोटके, जेष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण ओतारी, दीपक घारू, श्रेणिक शिंगवी, राजेंद्र क्षीरसागर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. 

नटराज पॅनलचे विजयी उमेदवार 
सतीश लोटके, शशिकांत नजान, सतीश शिंगटे, संजय घुगे, अमोल खोले, श्‍याम शिंदे, संजय लोळगे, तुषार चोरडिया, अभिजीत दरेकर, शिवाजी शिवचरण, विलास कुलकर्णी (राहुरी), अविनाश कराळे, प्रा. योगेश विलायते, शुभांगी कुंभार, सुनील राऊत, जालिंदर शिंदे, विशाल कडुसकर, राजेंद्र साबळे, सतीश काळे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT