kavalapur drama.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कवलापूरच्या या नाटकास उत्तरप्रदेशात क्रमांक

सकाळवृत्तसेवा

सांगली- उत्तरप्रदेशातील बरेली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात कवलापूर (ता. मिरज) येथील "लोककला महाराष्ट्राची आठवण परंपरेची' कार्यक्रमात सहभाग घेतला. तर नाटक विभागातील "धिंड' ( जुलुस) नाटकास तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 


बरेली येथे अखिल भारतीय संगीत व नाटक सांस्कृतीक संमेलन व आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव साजरा झाला. देशातील एकरा राज्यासह बांगलादेशातील कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. संमेलनात महाराष्ट्र राज्यातील सांगलीतील कवलापूरच्या कलाकारांनी " लोककला महाराष्ट्राची आठवण परंपरेची' या कार्यक्रमात कलाकारांनी सहभाग घेतला. 


नाटक विभागातील कलाकारांनी "धिंड' नाटक सादर केले. या नाटकाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. नाटकांचे निर्माता बालासाहेब पवार, दिग्दर्शक राजू पवार यांनी केले. या नाटकाला तिसऱ्या क्रमांकासह वैयक्तिक पारितोषिकेही मिळाली. त्यात बाळासाहेब पवार ( सर्वोत्कृष्ट अभिनेता), मोहिनी खोत (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), बबन यादव ( सर्वोत्कृष्ट वेशभूषा), प्रभू पवार ( सर्वोत्कृष्ट संगीत) यांचा समावेश आहे. 


धिंड नाटकांची पटकथा संवाद दादा माळी, नेपथ्य संजय नाईक, बबन यादव, शीतल माळकर, बबन पवार, सुर्यकांत कदम, अजिंक्‍य गुंडे या कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. नृत्य विभागातून मोहिनी खोत यांना प्रथम क्रमांक मिळाला. दीपाली कदम, ऐश्‍वर्या दळवी, प्रीती, सृष्टी, असिफा या कलाकारांना वैयक्तिक पारितोषिके मिळाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT