Anchor on the Dreams: Time to throw away the cash crops 
पश्चिम महाराष्ट्र

स्वप्नांवर नांगर : नगदी पिके टाकून देण्याची वेळ

शामराव गावडे

नवेखेड : कोरोना विषाणूचा प्रसार व त्यातून झालेली लॉक डाऊनची परिस्थिती याचा मोठा फटका नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांनी कुटुंबासाठी बघितलेल्या हिरव्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. इथून पुढे कसे जगायचे शेतीला पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

कृषी-औद्योगिक मध्ये क्रांती करणारा हा जिल्हा ठिकठिकाणी झालेली सिंचनाची सोय यातून नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा वळलेला कल त्यातून होणारी अर्थप्राप्ती त्याद्वारे पाहिलेली स्वप्ने सध्या स्वप्नेच राहिली आहेत गेली पंधरा दिवस झाले संपूर्ण भारतात लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेती मालाला उठाव नाही, मार्केट बंद आहे, पिके तर तोडणीला आली आहेत, गावागावातून विकावे तर ते शक्‍य नाही, कारण रिटेलला गिऱ्हाइक कमी आहे. शेतकऱ्यांना डोके धरून बसायची वेळ आली आहे. महापुरातील सावरलेल्या शेतकऱ्यांनी मिरची, भोपळा, फुले यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली. उन्हाळ्याच्या सुरवातीला या पिकांना चांगला दर मिळतो हा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव, तो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी कामाचे चक्र थांबले. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

कारंदवाडी तालुका वाळवा येथील शेतकरी प्रशांत आवटे म्हणाले,""अडीच एकर ढोबळी मिरची केली आहे. सध्या साठ दिवस पूर्ण झाले आहेत. परिपक्व होऊन तोडणीस सुरवात केली. सर्वत्र मार्केट ठप्प आहे. पॅकिंगसाठी लागणारे साहित्य मिळत नाही. उठाव नसल्याने माल पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मार्केट ठप्प झालेमुळे एवढा माल काय करायचा? हा प्रश्न माझ्यासमोर होता. तब्बल पावणे पाच लाख रुपये आज अखेर खर्च केले आहेत. तोडलेली ढोबळी मिरची पोती भरून उसाच्या सरीत टाकून त्याचे खत करण्याचे काम नाइलाजाने सुरू करावे लागले आहे. सोन्यासारखा पिकविलेला माल मातीआड करावा लागत आहे.'' 

नवेखेड (ता. वाळवा) येथील शेतकरी पिंटू नायकवडी म्हणाले,""मी सव्वा एकर क्षेत्रात गलांडा फुलाची चार महिन्यांपूर्वी लागवड केली होती. कोल्हापूर मार्केटला मी थेट जाऊन विक्री करत होतो. चांगले पैसे मिळत होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट ठप्प झालेले माल कुठे न्यायचा? हा प्रश्न होता. आणखी चार लाखरुपये उत्पन्न सहज मिळाले असते. मी मन घट्ट करून सरळ छातीबरोबर वाढलेल्या झाडावर कुऱ्हाड चालवली. जीवापाड जोपासलेली बाग क्षणार्धात कुऱ्हाडीने तोडून टाकली व शेत पुढील पिकासाठी तयार करण्याचे काम सुरू आहे.'' 

नाईलाजाने पिकावर रोटर फिरवला

मी दोन एकरात रताळी हे नगदी पीक घेतल्यानंतर पुन्हा त्या क्षेत्रात भोपळा केला. भोपळा काढणी योग्य झाला. परंतु मार्केट बंद झाल्याने तो विक्रीसाठी नेऊ शकत नाही. नाईलाजाने मी या पिकावर रोटर फिरवला पीक जमिनीत गाडले. 
- राजेंद्र पाटील, उपसरपंच, नवेखेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT