mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षकांना पैसे आणि धुलाई भत्ता मिळाला तरच ड्रेसकोड घोलतील

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून प्राथमिक शिक्षकांना जर तुम्ही गणवेशाचे पैसे आणि धुलाई भत्ता देणार असाल तर आमचे शिक्षक ड्रेसकोड घालतील असे मत राज्य प्रा. शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी व्यक्त केले.

तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आचार्य दादासाहेब दोंदे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते
.व्यासपीठावर वक्ते गणेश शिंदे, पं स सभापती प्रदीप खांडेकर, समाजकल्याण सभापती शिला शिवशरण, नगराध्यक्षा अरूणा माळी, जि.प. सदस्या शैला गोडसे, दामाजीचे संचालक सचिन शिवशरण, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे, बजरंग पांढरे, जिल्हाध्यक्षा चंदाराणी आतकर, मनीष भाऊ हनुमंत कोष्टी, अरुण डोरले, कार्याध्यक्ष संजय चेळेकर, भाऊसाहेब माने, संभाजी तानगावडे, भारत शिंदे,अनिता भिंगे, भगवान चौगुले, लक्ष्मण घुले, संतोषकुमार पवार, राजेन्द्र केदार, रामचंद्र दोलतोडे, गौतम दोडके, शिवाजी लेंडवे, सखाराम सावंत आदीसह शिक्षक पुरस्कारार्थी उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना बाळकृष्ण तांबारे म्हणाले की, काम करणाऱ्या शिक्षकांना काही नियम घालून पेन्शन पासून परावृत्त करण्याचे प्रयत्न शासन करत आहे. मात्र नवीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. राज्य शासनाने राज्यातील 70 टक्के शिक्षकांच्या बदल्या केल्या या बदल्यामुळे काही फायदा झाला नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन यांच्या कार्यक्रमात धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे. 35 प्रकारची अनेक कामे शिअक्षकाना दिल्याने त्यांच्याकडून ज्ञानदान श्रेष्ठ कसे होणार असा सवाल उपस्थित करत मंगळवेढ्यातील संत दामाजी ने राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी अशी पांडुरंग चरणी प्रार्थना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT