Driver Of Tasgaon Police Deputy Superintendent Arrested In Bribe case 
पश्चिम महाराष्ट्र

तासगाव पोलिस उपाधीक्षकांच्या चालकाने घेतली लाच 

सकाळ वृत्तसेवा

सांगली - तासगाव पोलिस उपाधीक्षक यांच्या वाहनावरील चालक पोलिस नाईक विजय भगवान घुगरे (वय 34, अष्टविनायक नगर, वारणाली, सांगली) यास साडेचार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. भिलवडी येथील रत्नाकर बॅंकेसमोर हा सापळा रचला होता. 

अधिक माहिती अशी, की तक्रार यांनी निशिदी कॉर्नर, माळवाडी (ता. पलूस) येथे ऑनलाईन पद्धतीने पैसे लावून हार-जितचा खेळ हा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायात तक्रारदार यास सहकार्य करून कोणतीही कारवाई न करण्यासाठी विजय घुगरे याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. चर्चेअंती साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास करण्यात आली. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. त्यात घुगरे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

साडेचार हजार रुपये घेताना रंगेहात पकडले

तक्रारदार याच्याकडून भिलवडी येथील रत्नाकर बॅंकेसमोर पैसे घेण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा लावला. विजय घुगरे याने साडेचार हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानुसार त्याच्याविरोधात भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घुगरे याची नेमणूक तासगाव पोलिस ठाण्यात आहे. प्रतिनियुक्तीवर तो उपाधीक्षकांच्या गाडीवर चालक म्हणून होता. अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक राजेंद्र साळुंखे, निरीक्षक प्रशांत चौगुले, जितेंद्र काळे, संजय कलकुटगी, अविनाश सागर, अशोक तुराई, संजय संकपाळ, राधिका माने, सारिका साळुंखे-पाटील, बाळासाहेब पवार यांचा कारवाईत सहभाग होता. 

तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 

लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार द्या. याशिवाय 1064 या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार देता येऊ शकते, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात १२०० फूट खोल दरीत फॉर्च्युनर कोसळली; मोठ्या उद्योजकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

८ वर्षांपासूनचे प्रेमसंबंध तोडले, तरुणाला राग अनावर, प्रेयसी आई-वडिलांसह घरी असताना लावली आग; डोंबिवलीत खळबळ

Akola News: अघोरी कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ,दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात , अनिष्ट प्रथांना बळी न पडण्याचे आवाहन

'दिलरुबा दिलनशी...' गाण्यावर सुकन्या मोनेंचा भन्नाट रील; ऐश्वर्यानेही धरला ठेका!

Marathi News Live Updates : Pune : २०२७मध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल - उत्तराखंड मुख्यमंत्री, पुष्कर सिंह धामी

SCROLL FOR NEXT