drone will keep watch on cleaning work in Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

इथल्या नालेसफाईवर राहणार ड्रोनची नजर...

सकाळवृत्तसेवा

सांगली, ता. 13 : महापालिका सध्या कोरोनाविरूद्ध लढत असली तरी सोबतच आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीची शक्‍यता लक्षात घेऊन पावसाळापूर्व नालेसफाई, पॅचवर्कची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. नालेसफाईसाठी 1.25 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. शहरातील नाला तसेच बफरझोनमधील 300 अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. नालेसफाईच्या कामावर ड्रोनची नजर राहणार असून प्रत्येक 100 मीटर कामाची छायाचित्रे ठेकेदाराला सादर करावी लागतील. त्याद्वारे ऑडट करुन त्याचे बिल अदा केले जाईल, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज स्पष्ट केले.

श्री. कापडणीस म्हणाले,"" "कोरोना' सोबतच प्रशासनाने पावसाळापूर्व कामेही हाती घेतलीत. नालेसफाईसाठी 24 टक्के कमी दराची निविदा दाखल झाली आहे. आजच ठेकेदाराला वर्कऑडर देणार आहोत. यंदा वरवरची नालेसफाई होणार नाही. नाल्याची खोली आणि रुंदी वाढवली जाणार आहे. ठेकेदाराला प्रत्येक शंभर मीटरच्या कामाची आधी आणि नंतरची छायाचित्रे ड्रोनद्वारे घ्यावी लागतील. नालेसफाईच्या फूटाचे मोजमाप आणि फोटोचे रेकॉर्ड होणार आहे. त्यानुसार ऑडिट होऊनच बिले अदा केली जाणार आहेत. केवळ यंत्रणा जगवण्यासाठी नालेसफाईचा फार्स होणार नाही. उलट नालेसफाई करून महापुराचा धोका टाळला जाईल.'' 

ते म्हणाले,""नाले आणि बफरझोनमधील अतिक्रमणांचा सर्व्हे करण्यात आला आहे. 300 पेक्षा जास्त अतिक्रमणे आहेत. शेरीनाला आणि मिरजेच्या सुंदरनगर नाल्याचा समावेश आहे. या नाल्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वत: ते काढून घेण्यासाठी नोटिसा बजावणार आहे. अन्यथा अतिक्रमणे जमीनदोस्त करून नाल्यांचा मार्ग खुला करू.'' 

डांबरीवर मुरुम नाही 
श्री. कापडणीस म्हणाले,""पावसाळ्यापूर्वी खराब रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी प्रभागनिहाय 25 लाखांच्या निविदा काढल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत यापुढे डांबरी रस्त्यावर मुरुमाचे पॅचवर्क चालणार नाही. पावसाळ्यात टिकणारे दर्जेदार पॅचवर्कच केले जाईल. गुंठेवारीतही मुरुमासाठी तरतूद केली आहे.'' 

तर प्लॉटधारकांकडून  खर्चवसुली 

शहरात अनेक ठिकाणी मोकळे भूखंड आहेत. तेथे कचरा, पाणी साचून डास, दुर्गंधी निर्माण होते. भूखंडधारकांनी स्वत:हून त्यांची स्वच्छता करुन घ्यावी. त्यांना सफाईच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यांनी स्वच्छता केली नाही तर महापालिकेमार्फत स्वच्छता करून त्याचा खर्च प्लॉटधारकांकडून वसूल केला जाईल.'

- नितीन कापडणीस, आयुक्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

SCROLL FOR NEXT