mangalvedha.jpg
mangalvedha.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

दुष्काळ जाहीर करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा :स्वाभिमानी शेतकरी संघटना

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : पावसाच्या आशेवर अवलंबून असलेल्या तालुक्यातील जिरायत शेतकऱ्य़ांनी गतवर्षी खरीप हंगामात विमा भरलेल्या 53 हजार शेतकऱ्यांला भरपाईची रक्कम देवून पावसाने हुलकावणी दिलेल्या तालुक्यात यंदा दुष्काळ जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निवासी नायब तहसीलदार गणेश लव्हे यांना दिलेल्या निवेदनात दिला. 

या संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहेत की, यंदा पावसाच्या आशेवर खरीपाची पेरणी केली पण पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकय्रांचे डोळे आभाळाकडे लागले. कर्ज काढून खरीपाची पेरणी केलेल्या शेतकरयांच्या नशीबात दुष्काळात तेरावा महिना आला. गतवर्षी विमा भरलेल्या शेतकऱ्यांला विमा वंचित ठेवले. तालुक्यात पावसाची टक्केवारी कमी असतानाही विमा कंपनीने चुकीचे निकष लावून शेतकऱ्याला वगळले असून ही 53 हजार शेतकऱ्यांची विमा भरपाई अगोदर द्यावी. याशिवाय उजनी लाभक्षेत्रात असलेल्या ऊस, मका या पिकावर हुमनीने विळखा दिला असून यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणीही निवेदनात नमुद केली या निवेदनावर अॅेड राहूल घुले, श्रीमंत केदार, शंकर संगशेटटी, आबा खांडेकर, बाळासाहेब कपले, रमेश चव्हाण आदीसह शेतकऱ्यांच्या सहया आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT