BLV20A01167_pr.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनामुळे झेंडू पिकावर फिरवला नांगर 

सकाळवृत्तसेवा

मुंबई बाजारात विक्री सुरू झाली. किलोस पंधरा ते पंचवीस रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र गेल्या आठवडाभरात सर्व चित्रच बेरंग झाले. फुलांची तोडणी करण्यास सांगुनही व्यापारी फिरकला नाही. झाडावर फुले दोन- तीन दिवसच टिकतात. तोडणी न झाल्याने पुन्हा पिकावर व्हायरस येतो. त्यामुळे दिवसाआड फुले तोडणी गरजेची असते. औषध, खत फवारणी, मजुरी, पाण्याची पाळी याचा खर्च अंगावर बसू लागला. 


एकरासाठी जमिनीची पूर्व मशागत, पेपर अंथरणे, रोपे, औषध, खते, मजुरी यासाठी सुमारे लाख रुपये खर्च झाला. सुरवातीच्या तोडणीतून वीस हजाराचे उत्पन्न मिळाले. मात्र कोरोना विषाणुसंसर्गाने फुलाची मागणी थांबली आहे. दरही गडगडले आहेत. स्थानिक बाजारातही त्याचा खप नाही, अशी स्थिती झाली आहे. 

कोट 
"गुढीपाडवा दरम्यान चांगला भाव मिळेल असे गणित होते. मात्र कोरोनामुळे ते बदलले. दररोजचा खर्च अंगावर बसू लागल्याने पिकात थेट ट्रॅक्‍टर घातला कष्ट करून हाती आलेले पीक नष्ट करताना वाईट वाटते मात्र नाईलाज आहे. 

भगवान शिंदे, झेंडू उत्पादक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Policy: मद्य व्यवसायात मोठे बदल! पारंपरिक मद्याला सरकारी मान्यता मिळणार; सरकारने लागू केले नवे नियम

Maharashtrachi Hasyajatra: प्रेक्षकांचा आग्रह सोनी मराठीने मानला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

Tragic Drowning: गोदावरीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी व त्यांना वाचवताना चुलतीचा बुडून मृत्यू; मोहळा गावावर शोककळा

INDW vs PAKW: T20 World Cup आज रंगणार सर्वात मोठा थरार! भारत-पाकिस्तान मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? वाचा सविस्तर

Ayodhya Ram Mandir Donation Scam: राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात खळबळजनक प्रकार उघड, कर्मचाऱ्याने घरात शेणाच्या ढिगाऱ्यात लपवले १० लाख रुपये

SCROLL FOR NEXT